रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडानी प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी भिमसैनिकांच्या वतीने जामखेड कडकडीत बंद…
पोलिस प्रशासनाने उर्वरित आरोपी बारा तासाच्या आत जेरबंद न केल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन करू – आँल इंडिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार
जामखेड प्रतिनिधी,
पंधरा दिवसांपुर्वी तालुक्यातील नान्नज येथे झालेल्या सशस्त्र प्राणघातक हल्ला प्रकरणाती आरोपींना ताबडतोब अटक करावी. साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, प्राणघातक हल्ला ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. हा हल्ला आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांवरील आहे. तेव्हा कोंबिंग आँपरेशन राबवत आरोपींना अटक करा अन्यथा गृहमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिपक केदार यांनी दिला.रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडानी दि 24 ऑगस्ट रोजी सशस्त्र प्राणघातक हल्ला करून कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केले होते. त्यासंबंधी पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आज जामखेड शहर कडकडीत बंद तसेच खर्डा चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी जामखेड मधील तसेच आसपासच्या तालुक्यातील रिपाई, दलित पँथर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या. सुनील साळवे कुटुंबियांवरील हल्लेखोरांना बारा तासाच्या आत अटक करा अटक करा अन्यथा गृहमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा इशारा अनेक नेत्यांनी दिला.या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक केली असुन उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी आज रविवार दि 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जामखेड शहरात बंद पुकारण्यात आला.या बंदला व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी जामखेड शहरातुन निषेध फेरी काढण्यात आली. व खर्डा चौक याठिकाणी भव्य रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाला केदार यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव, पँथर चे दिपक केदार, परांडा, पाटोदा, आष्टी येथील नेते व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.