विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नाने सांगवी येथील नाथ मस्कोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ला राज्य शासनाची मंजुरी
जामखेड प्रतिनिधी,
केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार गाव तिथे सोसायटी होणे गरजेचे असून त्याचा फायदा जामखेड तालुक्यात होत असून विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या आदेशाने राज्य सरकारने सांगवी येथील नाथ मस्कोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला मान्यता देण्यात आलेली आहे सदर संस्था झाल्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांना शेती कर्ज मिळणार असून कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही.

त्याचप्रमाणे लवकरच जामखेड तालुक्यातील पाच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना देखील मान्यता मिळणार असून त्यामुळे जामखेड तालुक्यातील कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी पावले उचलली असून त्या ही संस्थांना लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परवानगी मिळेल.

या अगोदर नाहुली येथील नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला सप्टेंबर 2022 मध्ये मान्यता मिळवून देखील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अडमुठे पानाच्या धोरणामुळे मागील तीन वर्षापासून शेतकरी कर्जापासून वंचित आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळू नये यासाठी मागील तीन वर्षापासून न्यायालयीन दावे प्रलंबित असताना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी देखील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला आदेश दिले आहेत की नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला सभासद करून कर्ज वाटप करावे.
सांगवी येथील सर्व शेतकऱ्यांनी व संस्थेचे मुख्य प्रवर्तक मुन्ना शेख, मा. अशोक महारनवर (मा सरपंच) यांनी सभापती राम शिंदे यांचे आभार मानले.
चौकट
नुकतीच पार पडलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी जाहीर केले होते की यापुढे मला बँकेमधील निवडणुकीला लक्ष घालावे लागेल त्याचा प्रत्यय जामखेड तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना आला.
![]()