महावीर भवन येथील वातानुकूलित हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
आज दि १ मार्च रोजी जैन संत डॉ समकीत ऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत महाविर भवन येथे भव्य दिव्य (ए सी) वातानुकूलित हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदरील हॉल चे उद्घाटन दानशूर उद्योजक लाभार्थी अशोक जी, प्रकाश जी ,सतिश जी,सुनिल जी पितळे, परीवार व उद्योजक दानशुर अमित आशोकलालजी चोरडिया परीवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच हॉलच्या इतर कामकाजासाठी सकल जैन समाजातील दानशुर व्यक्ती जवाहरलालजी चंपालालजी गुंदेचा यांनी देखील मोठी मदत केली होती त्यामुळे गुंदेचा परिवाराचे सर्वांनी आभार मानले. याच बरोबर नितीन जी बाफना, हिम्मत जी गांधी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे व यापुढेही अनेकजण दानदाते मदत करणार आहेत अशी माहिती जैन श्रवाक संघ यांनी दिली.
सेवाभावी या वृत्तीने जामखेड सकल जैन समाज महावीर भवन या वास्तुचा ना नफा ना तोटा तत्त्वावर जामखेड वासीयांसाठी उपलब्ध करुन देत आहे तरी सर्व जामखेड वासीयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन श्रावक संघ यांनी केले आहे. यावेळी संपुर्ण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सह सर्व संचालक उपस्थित होते. व सकल जैन समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.