दिराने भावजयीच्या डोक्यात लाकडी ढलपी घालुन केला खुन, पतीसह दिराला अटक, दोघांन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल .
जामखेड प्रतिनिधी
घरात कीराणा सामान आणण्यासाठी नवर्याने पैसै दिले नाहीत म्हणून पत्नीने नवर्याच्या तोंडात मारली. ते पाहून याचा राग दिराला आल्याने त्याने रागाच्या भरात भावजयीच्या डोक्यात लाकडी ढलपी घालुन खुन केला. या प्रकरणी पतीसह दिराला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.
सीमा बाळु घोडेस्वार वय ३५ वर्षे ,रा साकत असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मयत सीमा हीचे १५ वर्षापुर्वी आरोपी बाळु अरुण घोडेस्वार याच्या सोबत लग्न झाले होते. ती आपल्या सासरी साकत या ठिकाणी नांदत होती. त्यांना दिक्षा नावाची १३ वर्षाची मुलगी आहे. सीमा ही सासरी नांदत असताना तीचा पती व दिर हे तीला संसार चालवण्यासाठी व दारु पिण्यासाठी माहेरुन पैसै घेऊन ये या मागणीसाठी वेळोवेळी छळ करुन मानसिक त्रास देत होते.
रविवार दि ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मयत सीमा हीचा पती हा गावातील एका शाळेत दारु पिऊन बसला होता. घरातील कीराणा सामान संपल्याने पत्नी व मुलगी हे पैसे मागण्यासाठी आरोपी पती याच्याकडे गेले. मात्र पैसै देण्यास आरोपी पतीने नकार देताच मयत पत्नी सीमा हीने पतीच्या तोंडात एक झापड मारली. तसेच दारु पीऊ नये म्हणुन खिशातील ४०० रु काढुन घेतले. यावेळी दुसरा आरोपी मयत सीमा हीचा दिर देखील त्या ठिकाणी होता व त्याने आपल्या भावाच्या तोंडात भावजईने झापड मारलेली पाहीली होती.
पत्नी घरी आल्यानंतर तीच्या मागे तीचा दिर अतुल घोडेस्वार हा देखील मागे आला व आपल्या भावाच्या तोंडात मारल्याने त्याला राग आल्याने तो घरात गेला व घरातील लाकडी धपली हातात घेऊन बाहेर आला. यावेळी त्याची भावजई ही शेतातुन काम करुन आली असल्याने तोंड धुत होती. यावेळी दिर अतुल घोडेस्वार याने हातातील लाकडी धपली रागाच्या भरात भावजयीच्या डोक्यात दोनवेळा घातली. या घटनेत भावजई गंभीर जखमी झाल्याने तीला जामखेड येथील हॉस्पिटल नेण्यात आले मात्र तो पर्यंत तीचा मृत्यू झाला आसल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. या प्रकरणी मयत सीमा हीचे वडील राजेंद्र आश्रुबा सरोदे रा. घुमरा. पारगाव. ता. पाटोदा. जिल्हा बीड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती बाळु अरुण घोडेस्वार व दिर अतुल अरुण घोडेस्वार यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती पो. ना. कोपनर, पो. कॉ. प्रवीण इंगळे, पो. कॉ. प्रकाश मांडगे, पो. कॉ. कुलदीप घोळवे, पो. कॉ. पळसे, पो. कॉ. देशमाने, पो. कॉ. नवनाथ शेकडे, पो. ना. जितेंद्र सरोदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत काही तासातच तातडीने कारवाई करीत अरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत.