संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने ‘शिपी आमटी’ चा महाप्रसाद
जामखेड प्रतिनिधी दि
शहरातील कोर्ट रोड वरील प्रसिद्ध असलेल्या संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविक भक्तांनी स्पेशल झणझणीत गावरान तोंडाची चव वाढवणारी शिपी आमटी चा लाभ घातला यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,उद्योजक आकाश बाफना यांनी उपस्थितीत लावली होती
संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते,मंडळाला आजवर अनेक तालुका,जिल्हास्तरीय आदर्श मंडळ म्हणून पुरस्कार मिळाले आहेत,त्यातच सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून आज दिनांक.२४ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या आवारात करण्यात आले होते.
यावेळी सुंदरदास बिरंगळ,अमोल आंधळे,हितेश वीर,निलेश तवटे,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,सतीश पवार,माउली राळेभात,विनायक राऊत,मयूर टेकाळे,दीपक ढोले,अशोक हुलगुंडे,विशाल लोळगे,ऋषीकेश ओझर्डे,स्वप्निल बरबडे,ताजोददीन शेख,नाना कोल्हे,युवराज पाचांग्रे,कैलास विटकर,भरत आटोळे,संजय फुटाणे,सतीश राळेभात,चेतन राळेभात,वेंदात दळवी,आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी सुप्रसिद्ध सैराट हॉटेलचे संचालक अमोल फंदाडे आचारी गोरख पवार संतोष झगडे यांनी तयार केलेल्या शिपी आमटीवर नागरिकांनी ताव मारला,