*सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल*

जामखेड प्रतिनिधी,

हॉटेल सेलिब्रेशन नगर रोड समोर एका महिन्यात आठ जण जखमी

हॉटेल सेलिब्रेशन समोर रोडचे काम चालू आहे परंतु तेथे शंभर फूट रोड करण्याचा राहिला असल्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये गाड्या फास्ट आलेल्या जातात आणि त्यामधील लोक जखमी होतात याकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टरने आणि अधिकाऱ्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे सदर घडलेल्या अपघाताची माहिती संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनीयर सुरज पुरी यांना वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली आहे

सायंकाळी ८=०० वाजता सुधीर अंकुश कोल्हे वय ३८ राहणार जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांचा मोटरसायकल वर जात आसतांना रोडचा अंदाज न आल्याने रोडवर बऱ्याच ठिकाणी खटकी असल्यामुळे अपघात होऊन गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे आणि हात फॅक्चर झाला आहे

दुसरा अपघात तसेच आयशर टेम्पो साकत घाटामध्ये पलटी झाला असता नासिर इब्राहिम कुरेशी राहणार जामखेड तालुका जामखेड यांचा साकत घाटामध्ये अपघात झाला असून त्यास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णवाहिका पाठवून दवाखान्यात दाखल केले त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर दोन्ही घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ता संजय कोठारी यांना संतोष नवलाखा आणि अविनाश कदम यांनी दूरध्वनी द्वारे कळवले असता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ताबडतोब गाडी पाठवून जखमींना दवाखान्यात दाखल केले आहे सदर माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे इंगळे दादा घोळवे दादा करीत आहेत.

या अपघाता दरम्यान जखमींना समीर चंदन, दीपक शेळके, अमित पठाडे ,आदींनी मदत केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *