सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त
मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न.
जामखेड –
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्लीचे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, अहिल्यानगरचे इंडो आयरिश हॉस्पिटल , जामखेडचे समर्थ हॉस्पिटल आणि कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य
संजय सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सारडा कॉलेजचे अध्यक्ष सुमतीलाल कोठारी, इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉ दिलीप जोंधळे, अहिल्यानगरचे धर्मादाय आयुक्त बाबासाहेब शेकडे, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक चंपालाल लोढा, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुराई , केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी गणेश लकारे
सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर ,जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य पारस मुथा, चंद्रकांत चोरडिया , शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, उद्योजक आनंद कोठारी, सैनिक सहकारी बँकेचे व्यवस्थापक संतोष भानगडे, नगरसेवक अमित चिंतामणी,डॉ सुरेश काशीद, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे विनोद बलदोटा , डॉ. उमेश गांधी, विजय कोठारी ,अमृत कोठारी ,अनिल पोखरणा, सुरज गांधी, अशोक बडे, योगेश पवार , डॉ.विशाल हरकर , मामा लोढा ,जितेंद्र बोरा विनोद बोरा, विनोद बेदमुथा, सुनील चोरडिया ,प्रशांत बोरा, मनोज भंडारी, युवराज पोकळे, चंद्रशेखर कुलकर्णी दिलीप भंडारी, प्रकाश पितळे, बबन खराडे, प्रकाश मुरूमकर, शांतीलाल गांधी ,आनंद नहार, मनोज कांबळे राधाकिसन गोरे, सुरेंद्र देशमुख बीड, मनोज कांबळे, किरण माने ,संदीप लबडे, प्रशांत कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर, गोशाळेतील जनावरांना हिरवा चारा वाटप, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टांना भोजन देण्यात आले.
यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सुराणा म्हणाले, संजय कोठारी यांना आपण आरोग्य दूत म्हणतो. परंतु ते केवळ आरोग्यदूत नसून, देवदूतच आहेत. कारण कालच अपघातातील तीन जणांना त्यांनी पुन्हा वाचवले. सहा हजारांवर लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजय कोठारी ह प्रत्येक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. कोरोना काळामध्ये ते घरात बसून राहिले नाहीत.तर रस्त्यावरील अपघातग्रस्तांना वाचवण्याचं काम त्यांनी करतानाच वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे.
सर्वरोग निदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी ,माजी सरपंच सुनील कोठारी, समर्थ हाॅस्पीटलचे संचालक डाॅ.भरत दारकुंडे , हर्षल कोठारी, संकेत कोठारी,सचिन गाडे , प्रफुल्ल सोळंकी, रोहिदास केकान , धनंजय भोसले, दीपक भोरे यांच्या सह आणि संजय कोठारी मित्र मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.