भावी नगरसेवक संतोष (भाऊ)गव्हाळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा
समता तरूण मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वातप
जामखेड प्रतिनिधी
समता तरूण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. संतोष गव्हाळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उद्या बुधवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर आरोळे वस्ती येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबीरामध्ये चाळीस वर्षे वयोगटावरील गरजु रूग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे
तरी जामखेड शहरातील रूगणांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी आसे अवहान समता तरूण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला पाहिजे समाजाच्या तळागळातील काही घटक आजही आरोग्याची कोणतीही तपासणी करून घेत नाही डोळ्यांच्या तपाणीबाबत दुर्लक्ष होत असल्याने आनेकांना कमी वयामध्ये दृष्टी दोशाला सामोरे जावे लागते आणी असे रुग्ण तपासणीसाठी रूग्णालयात जात नाही त्यामुळे आमच्या मंडळाने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे
यामाध्यमातून समाजाची सेवा आपल्या हातुन घडावी तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने आनाठाई होणारा खर्च अशा समाजिक कार्यासाठी वापरला गेला तर वाढदिवस सार्थकी लागेल आशी भावना संतोष (भाऊ) गव्हाळे यांनी व्यक्त केली आहे.