उत्सव देशाचा.. जल्लोष संविधानाचा.. जामखेड येथे संविधान महोत्सव संपन्न..

उत्सव देशाचा.. जल्लोष संविधानाचा.. जामखेड येथे संविधान महोत्सव संपन्न..

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान..

जामखेड प्रतिनिधी,

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व देश ऋणी – प्रा. श्रीकांत होशिंग
संविधान महोत्सवात अजय देहाडे यांच्या गीतांच्या कार्यक्रमासह विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचा सन्मान

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि दलित बौद्ध चळवळीचे प्रणेते होते. अस्पृश्यता नष्ट करणे, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. देशाला संविधान दिले या महान कार्याबद्दल संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे असे प्रा. श्रीकांत होशिंग यांनी सांगितले.

जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारी २०२६ रोजी“संविधान महोत्सव – २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी भव्य मोटारसायकल रँली आयोजित करण्यात आली होती. यानंतर विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, शिवसेना युवा नेते आकाश बाफना, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, नगरसेवक अँड डॉ. अरूण जाधव, प्राचार्य बी. ए. पारखे, एस एन पारखे, रोहित घोडेस्वार, मुकुंद राऊत, राजू गोरे, वसिम सय्यद, फिरोज कुरेशी, नितीन ससाणे, उमाताई जाधव, अशोक आव्हाड,जमीर सय्यद, डॉ. कैलास हजारे, प्रा. जाकिर शेख, समिंदर सर, विकी सदाफुले, प्रिन्स सदाफुले, सनी सदाफुले, सुशीलकुमार सदाफुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीकांत होशिंग म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र देत समाजात आत्मसन्मान व अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. त्यांचे कार्य मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी आजही प्रेरणादायी आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल डॉ.सुशिल पन्हाळकर,सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल संतोष टेकाळे, पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक समस्या मांडणारे, वंचितांना न्याय मिळवून देणारे सुदाम वराट, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्रीकांत होशिंग, वृक्षमित्र उत्तम पवार यांना पुरस्कार देण्यात आले यावेळी संविधान प्रत तसेच सुंदर ट्राँफी प्रदान करण्यात आली.

यावेळी झी युवा संगीत सम्राट फेम, काळजावर कोरले नांव भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर, प्रबोधनात्मक विविध शिव भिम गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करून जुने व नविन गिते सादर केली,या वेळी उपस्थित जनसमुदाय यांनी टाळ्यांच्या कडकडाटांनी साथ दिली.विकी भाऊ सदाफुले व समस्त भिमसैनिकांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमानंतर सर्वांची जेवणाची सोय करण्यात आली होती.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page