*आ.रोहित पवार जनतेची दिशाभूल करत आहेत – सभापती पै. शरद कार्ले*
पूल कोसळला नसून झाड कोसळल्याने वाकला-सभापती शरद कार्ले
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरातील श्री नागेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात सुरू आहेत.धाकट्या नदीकाठी जाण्यासाठी लोखंडी पूल, नदीकाठावरील काँक्रेट रस्ते, दगडी पिचिंग तसेच नदीपात्रात उतरण्यासाठी दगडी घाट अशा सुविधा उभारण्यात आल्या होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री पावसाचा कहर पाहायला मिळाला आणि नागेश्वर मंदिर परिसरातील लोखंडी पूल व नदीकाठाची कामे वाहून गेली नाहीत.या पूलाची पाहणी करण्यासाठी बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, या पुलाच्या कामाचा उल्लेख आमदार रोहित पवार यांनी स्वतः च्या फेसबुक पेज वरून माहिती देताना सांगितले आहे की, विंचरणा नदीवरील पुलाचे काम तीन कोटी रुपये असे सांगितले आहे, पंरतु प्रत्यक्षात या पुलाचे काम ३८ लाख रुपयांचे आहे.नदीचे नाव विंचारणा नदी नसून धाकटी नदी आहे. तीन कोटी रुपयांची कामे यामध्ये काँक्रीट रस्ते, दगडी पिचिंग, दशक्रिया विधी घाट बांधकाम,किचन शेड व श्री नागेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची कामे कामे सुरू आहेत. राजकारण करताना अभ्यास करून कामाबद्दल बोलावे, राजकारणाची पातळी कुठपर्यंत असावी? मात्र आ.रोहित पवारांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.असा खोचक सवाल कार्ले यांनी उपस्थित केला.
कार्ले पुढे म्हणाले, राज्यात सर्वत्र पाऊस आहे. अचानक पावसाचे प्रमाण वाढल्याने झाड कोसळून बांधलेल्या पुलावर पडले आणि तो वाकला. मात्र आमदार रोहित पवार यांनी सांगितले की पूल कोसळला.