शेतकरी ऊर्जा वेबसाईटचे उदघाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न

शेतकरी ऊर्जा वेबसाईटचे उदघाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड – वीजे संदर्भातील तांत्रिक माहिती सोप्या सहज भाषेत समजावे यासाठी अरणगाव महावितरणचे सहाय्यक उपअभियंता सुजय उपाध्ये यांनी तयार केलेल्या शेतकरी उर्जा बेवसाईटचे अनावरण विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी चोंडी येथील निवासस्थानी केली. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी वीजगळती व कमी जास्त दाबाने वीज आल्यावर शेतकऱ्यांचे जे नुकसान होते ते ही बेवसाईट वरील माहिती वाचून आचरणात आणावी असे मत व्यक्त केले.

शेतकरी उर्जा बेवसाईटचे उद्घाटन चोंडी येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी सोमवारी झाले यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सदर बेवसाईटवर मत व्यक्त केले. याप्रसंगी विशाल शिंदे, भाजप शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद, कर्जत कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती काकासाहेब तापके, विशाल भांडवलकर, संतोष कुर्डूले व शेतकरी बांधव उपस्थित होते.

महावितरण अरणगाव ३३ के. व्ही. उपकेंद्राचे सहाय्यक उपअभियंता सुजय उपाध्ये यांनी वीज विषयक अडचणी लक्षात घेऊन त्या तांत्रिक दृष्ट्या कशा सोडवता येतील आणि त्याद्वारे कमीत कमी खर्चात अधिक कार्यक्षमपणे वीजेचा वापर कसा करता येईल यासाठी विजेसंदर्भातील तांत्रिक माहिती सहज, सोप्या आणि नेमक्या पद्धतीने शेतकरी वर्गाला समजण्यासाठी शेतकरी ऊर्जा ही वेबसाईट तयार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वीजेच्या समस्या व उपाययोजना सांगीतल्या आहेत. तसेच त्यांनी नान्नज व अरणगाव उपकेंद्रात येणा-या असंख्य शेतक-यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवून विजेच्या समस्या सोडवल्या आहेत.

यावेळी सुजय उपाध्ये यांनी माहीती देताना सांगितले की, शेतकरी मित्र वेबसाईटवर विजेच्या समस्या व त्यावर उपाययोजना दर्शविल्या आहेत. पारंपारिक मित्र गांडूळाप्रमाणेच ‘शेतकऱ्यांचा’ आधुनिक मित्र असलेल्या कॅपॅसिटर न वापरल्यामुळे देशाचे आणि निसर्गाचे होणारे नुकसान याची माहिती तसेच ज्यांनी कॅपॅसिटरचा वापर केला त्या प्रगतीशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन केले आहे. “विद्युत डीपी वारंवार नादुरुस्त होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय” याची सखोल माहिती.विद्युत अपघाताची कारणे आणि त्यापासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी अशी माहिती दर्शवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वीजपंपास कॅपॅसिटर बसवणे किती आवश्यक आहे हे समजेल.

*चौकट*

 

विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे विजेची गळती प्रमाण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अरणगाव सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांनी तयार केलेल्या बेवसाईट प्रमाणे उपाययोजना झाल्या तर विजेची बचत होईल. ऐन भरण्याच्या काळात मोठय़ा प्रमाणावर विजेचा लपंडाव होता. एखाद्या डिपीवरील शेतकऱ्यांचा एक वीजपंप फॉल्टी असेल तर इतर वीजपंप जळतात त्यामुळे या बेवसाईटची माहीती वाचून शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आणावी.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page