सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते शिवनेरी अकॅडमी येथे झेंडावंदन करण्यात आले
जामखेड प्रतिनिधी,
त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेड जिल्हा अहिल्यानगर च्या वतीने ७९ वा स्वतंत्र दिन शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली अध्यक्ष कोठारी प्रतिष्ठान जामखेड श्री संजय कोठारी यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आला.
“उत्सव तीन रंगाचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला
ज्यांनी भारत देश घडविला
ज्यांनी लिहिली आजादीची गाथा
त्यांच्या चरणी विनम्र माझा माथा
अशा देशभक्तीच्या पंगतीने सचिव शहाजी ढेपे यांनी सूत्र संचालनास सुरुवात केली यावेळी उपस्थित पंचक्रोशीतील त्रिदल आजी माझी पदाधिकारी संचालक सदस्य तसेच राजकीय शासकीय व्यापारी वर्ग शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर सत्कार समारंभ शिवनेरी अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी माऊली कुमटकर यांची आर्मी मध्ये सिलेक्शन झाल्यामुळे त्यांचे वडील जालिंदर कुमटकर, सदस्य हभप जगन्नाथ धर्माधिकारी बळीराम ढाळे निवृत्ती मेंगडे बाळू नेमाने या सर्वांचा सत्कार मुख्य अतिथीच्या हस्ते त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आला नंतर तहसील कार्यालय या ठिकाणी ध्वज रोहन संघटनेचे उपस्थित करण्यात आले व नवीन नगरपरिषद संविधान चौक या ठिकाणी त्रिदल सैनिक संघटनेच्या बहादूर जवानाच्या हस्ते इलेक्ट्रिक ध्वज रोहन संपन्न झाला व साडेदहा वाजता डीएन हॉटेल या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्याबद्दल निवृत्ती मेंगडे,बाळू नेमाने यांच्या टी- पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित साखर सम्राट अशोक चोरडिया, सुभाष भळगट, कोठारी प्रतिष्ठानचे संचालक राहुल राकेचा, मॅथवल्ड क्लासचे संचालक धनंजय भोसले ,अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, सल्लागार सुग्रीव अडाळे ,सहसचिव शांतीलाल जायभाय, मार्गदर्शक अरविंद जाधव, सदस्य अंजुम शेख ,भारत राऊत, दामोदर राऊत ,अशोक चव्हाण ,गणेश कदम ,बाळू कोठाळे, पोपट कोरडे ,रावसाहेब कापसे ,सुरेंद्र सानप ,हरिभाऊ कदम ,नवनाथ आंधळे, वसंत माळवे ,श्रीराम राळेभात, अशोक काळदाते ,दत्तात्रय डिसले ,ज्ञानदेव गोपाळघरे ,सतीश ठाकरे ,बाळू नेमाने ,बळीराम ढाळे, जगन्नाथ धर्माधिकारी, शहादेव पवार ,तानाजी गरजे, संतोष जगदाळे ,सचिव शहाजी ढेपे ,आमचे सहकारी पत्रकार समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्षम त्रिदल आजी-माजी सैनिक संघ जामखेड टीमचे सर्व क्षेत्रातून सर्व तालुक्यातून सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्र मधून कौतुक होत आहे अशी टीम होण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे गरजेचे आहे त्यामुळे आम्हाला गर्व आहे की आमची जामखेड टीम हमेशा एकीचे बळ दाखवते म्हणूनच सैनिक परिवाराचे काम, समस्या कार्यक्रम सोहळे यशस्वीरित्या पार पडतात.
उपस्थित सर्व पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक शहीद पत्नी वीर नारी वीरपिता वीर माता बहादुर जवान या सर्वांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन