जामखेड मध्ये शिवराज्याभिषेक उत्सव देशभक्ती शिवमय वातावरणात अतिशय उत्साहात संपन्न. 

जामखेड मध्ये शिवराज्याभिषेक उत्सव देशभक्ती शिवमय वातावरणात अतिशय उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तहसील पटांगणात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पहाटेच्या वेळी तिथी नुसार शिवराज्याभिषेक पूजा अतिशय उत्साह पूर्ण वातावरण मध्ये संपन्न झाला.

दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केट गणपती आरती संपन्न होऊन छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले.

मिरवणुकीची सुरुवात पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर भारतीय सेनेने राबवून पाकिस्तान वर 25 मिनिटात 15 ब्रह्मोस मिसाईल डागले सर्व महत्त्वाचे इयर बेस्ट नष्ट करून केले या भारतीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने ब्रह्मोस मिसाईल हुबेहूब साकारले याचे लोकार्पण आजी-माजी सैनिकांच्या हस्ते करून भव्य।I मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणुकी मधील वैशिष्ट्ये

भव्य छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, प्रभू श्रीरामचंद्र, हनुमान ,भगवान शंकर, विठ्ठल मूर्ती,ज्ञानेश्वर महाराज , बाजी प्रभू देशपांडे, मराठा आरमार देखावा, यांच्या भव्य मूर्ती होत्या.

या भव्य मोर्चा पाहून जामखेड कर यांचे डोळ्याचे पारणे फिटले. अशी भावना जामखेड करून व्यक्त केली.

 

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

 

केरळचे मधील नाद स्वरम वाद्य पथक, ,उत्तर प्रदेश मधील डमरू पथक , पंजाबी ढोल पथक

या पथकांद्वारे विविधतेतून एकात्मतेचे दर्शन जामखेड मध्ये पहावयास मिळाले . तसेच अश्वपथक, नंदी बैल, ढोल पथक, हलगी पथक, लाठीकाठी शस्त्र पथक , मुलींचा रोप मल्लखांब पथक, तुतारी पथक या सर्व पथकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

भारतीय सेनेचे झलक.

ब्रह्मोस मिसाईलने देशभक्ती वातावरण निर्माण झाले यामध्ये युवकांनी भारतीय सेनेचा विजय असो फलक हातात घेतले. तसेच आजी माझी सैनिक ऑन ड्युटीवर असलेले भारतीय सेनेतील जवान यामध्ये सहभागी झाले. यातून भारतीय सेनेची झलक मिरवणुकीत पाहण्यात आली.

 

शिस्तीचे दर्शन

पोलीस प्रशासनाला वाहतूक नियंत्रित करण्यासाठी अनेक शिवभक्त मावळे सहकार्य करत होते. मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली.

 

पारंपारिक वेशभूषा मध्ये अनेक मुले बाल शिवाजी राजमाता जिजाऊ व मावळ्यांच्या वेशात घोड्यावर बसलेले होते.

या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने माता भगिनी, तरुण युवक शिवभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

भव्य मिरवणुकीचा समारोप लक्ष्मी चौक संविधान स्तंभ या ठिकाणी करण्यात आला.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी मनोगतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा जामखेड मध्ये उभरावा अशी सर्व शिवभक्तांची मागणी आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला या शौर्याला मानवंदना देण्यासाठी आपण ब्रह्मोस मिसाईल साकारले, आम्हास राष्ट्र प्रथम सर्वोपरी आहे. गुरुवर्य भिडे गुरुजी मार्गदर्शन शिवभक्त पिढी घडवण्याची चालू आहे सर्वांनी गडकोट किल्ले मोहिमेत यावे असे मार्गदर्शन केले.

शेवटी शिवरायांचे आठवावे रूप प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page