*अनाथ मुलांच्या हस्ते लघुचित्रपट ‘काळीमा ’ पोस्टरचे अनावरण*
*जामखेड :-* येथील निवारा बालगृह, मोहा फाटा, समता भूमी बीड रोड येथे *ॲड. अरुण (आबा) जाधव* नगरसेवक यांचा *‘काळीमा’* या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण अनाथ मुलांच्या हस्ते करण्यात आले.
*‘काळीमा’* या शॉर्ट फिल्मची टॅगलाईन *“विशिष्ट जातीला लागलेला कलंक”* अशी आहे. भटके विमुक्त, आदिवासी जातीला लागलेला ठिपका, म्हणजेच कलंक याचे प्रतीक म्हणून या चित्रपटाला *‘काळीमा’* हे नाव देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना *अरुण (आबा )जाधव* यांनी भटके-विमुक्त आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. भटके-विमुक्त समाजावर, आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि जाळपोळ,जीवघेणे हाल्ले,सामाजिक कलंकाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.अरुण (आबा) जाधव स्वतः भटके-विमुक्त समाजातून आलेले असल्यामुळे या समाजाच्या वेदना आणि संघर्षाची त्यांना जवळून जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन *संतोष चव्हाण सर यांनी केले .या शॉर्ट फिल्मची कथा, पटकथा आणि दिग्दर्शक :- सचिन चव्हाण* यांनी केले असून *निर्माते :- उमाताई जाधव* यांनी जबाबदारी सांभाळली आहे.या कार्यक्रमास सचिन भिंगारदिवे, रेश्मा बागवान, बापू ओव्होळ,ऋषिकेश गायकवाड, , , संगीता केसकर, जाकीर मामा, गौतमी गंगावने, छाया मोरे, भक्ती पवार, संदीप आखाडे व बालगृहातील मुले, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैजीनाथ केसकर सर यांनी केले.
![]()
