जामखेड तालुक्याचा दहावीचा निकाल 96.50 टक्के

जामखेड तालुक्याचा दहावीचा निकाल 96.50 टक्के

बारावी प्रमाणे दहावीत ही जिल्ह्यात जामखेड तालुक्यात दुसरा क्रमांक

जामखेड प्रतिनिधी,

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात दहावी बारावीच्या परीक्षा काँपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडल्या याचा परिणाम विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा दिल्या व चांगला निकाल लागला. बारावीच्या निकालात जामखेड तालुका जिल्ह्यात दुसरा राहिला होता दहावीचा निकालही चांगला लागला असून 96.50 टक्के तालुक्याचा निकाल आहे.

बारावी प्रमाणे दहावीत ही जामखेड तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याची शैक्षणिक घोडदौड चांगलीच चालू आहे. शैक्षणिक दृष्ट्या मागास समजला जाणारा तालुका आता जिल्ह्यात अग्रेसर ठरत आहे, नवोदय, शिष्यवृत्ती, बारावी व आता दहावी या सर्व परीक्षेत तालुका अग्रेसर आहे.


तालुक्यातील सात विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव, केदारेश्वर विद्यालय जातेगाव, जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव, विंचरणा विद्यालय पिंपरखेड, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी, खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड, जय हनुमान विद्यालय कोल्हेवाडी या सात विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

जामखेड तालुक्यातून 2349 विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते यापैकी विशेष प्राविण्य 1085, प्रथम श्रेणी मध्ये 826, द्वितीय श्रेणी मध्ये 310, पास श्रेणी मध्ये 46 एकुण 2267 मुले पास झाले आहेत. म्हणजे तालुक्याचा एकुण निकाल 96.50
अनेक विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

तालुक्यातील ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड 98.47 टक्के, श्री साकेश्वर विद्यालय साकत 98.18 टक्के, जवळा 97.70 टक्के, नागेश विद्यालय 95.67 टक्के, फक्राबाद 98.81 टक्के,
भैरवनाथ विद्यालय शिऊर 97.43 टक्के, कन्या विद्यालय जामखेड 97.96 टक्के अशा प्रकारे निकाल आहेत.

जामखेड तालुक्यातील एकुण निकाल पुढील प्रमाणे आहे.

परीक्षेस बसले २३४९
विशेष प्राविण्य. १०८५
प्रथम श्रेणी. ८२६
द्वितीय श्रेणी. ३१०
पास. ‌‌ ४६
एकूण उत्तीर्ण. २२६७

शेकडा. ९६.५०%

श्री साकेश्वर विद्यालय साकत चा निकाल 97.18 टक्के लागला असून
प्रथम क्रमांक- वराट शिवरत्न कैलास 96.60
द्वितीय क्रमांक – घोलप ऋतुजा नामदेव 89.80
तृतीय क्रमांक – घोलप प्रतिक्षा दत्तात्रय 85.

सर्व गुणवंत व यशस्वी विदयार्थ्याचे जामखेड तालुक्याचे तहसिलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पालक यांनी अभिनंदन केले आहे .

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page