महाराष्ट्र हादरला.. तहसीलदाराचा भीषण अपघात, जागीच मृत्यू
बीड –
कर्तव्यदक्ष अधिकारी, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि केज तालुक्याचा तरुण चेहरा असलेले तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी एका भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा काळाचा घाला घातला. एका कार्यक्षम अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महसूल प्रशासन सुन्न झाले असून केज तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आज सकाळी आपल्या कारने प्रवास करत होते. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर जवळील पिंपळ फाटा इथे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटलं आणि कार उलटली. एकदा नाही तर दोन तीन वेळा ती उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.
एका प्रवासाचा करुण अंत
अपघाताच्या वेळी कारमध्ये ते एकटेच होते. महामार्गावर कार पलटी झाल्याचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस सध्या या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.
![]()
