जामखेड शिवसेनेच्या वतीने जामखेड शहरामध्ये विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती साजरी

जामखेड शिवसेनेच्या वतीने जामखेड शहरामध्ये विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 135 जयंती साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेऊन भविष्याची वाटचाल करावी: आकाश बाफना

जामखेड प्रतिनिधी,

जगातील सर्वात मोठे लोकशाही असलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सदाफुले वस्ती येथील आंबेडकर ब्लॉक येथे आकाश शेठ बाफना यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना आकाश शेठ बाफना म्हणाले की सर्वसामान्य माणसाला यशाचा शिखर दाखवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आजच्या आपल्या तरुण पिढीने घेऊन भविष्याची वाटचाल करावी त्यांनी माणसाच्या डोळ्यात स्वप्न दिली. मनामनात आत्मविश्वास निर्माण केला उभ उभे राहण्याची हिंमत दिली . डॉक्टर बाबासाहेबांचे शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे तत्त्वज्ञान आजही तितके जिवंत आणि प्रेरणादायी आहे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे याची जाणीव करून देत त्यांनी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम केले.असे प्रतिपादन शिवसेना युवा नेते आकाश जी बाफना यांनी केले.
यावेळी उपस्थित आकाश बाफना युवा नेते शिवसेना, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने सर,आंबेडकर चळवळीचे नेते विकी भाऊ सदाफुले, सोनू सदाफुले,दीपकभाऊ सदाफुले,अमोल सदाफुले,अजय अवसरे, सुनील जावळे, अभिमान गायकवाड, सुहास आव्हाड, गणेश लुंकड, विकी पिंपळे, अदी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles