*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे*
*बूथ कमिटी बांधण्याचा खा सुजय विखे पाटलांचा सपाटा*
पाथर्डी ५ एप्रिल :-
अहिल्यानगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे. सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूथ कमिटी सभेत केले.
डॉ. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी आपल्या प्रचाराचा सपाटा लावला आहे. गावोवावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी मतदार संघातील सर्व तालुकास्तरावरील बूथ कमिटीच्या बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे घेणे, घटक पक्षांच्या सभा घेण्याचे काम ते साध्य करत आहेत. अशीच बूथ कमिटीची बैठक खरवंडी कासार येथे शुक्रवारी बोलावण्यात आली होती.
यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आधाडीवर निशाणा साधताना तीन वर्षांच्या काळात तालुक्याला एक रुपयांचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला. तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन निधी दिला आहे. यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही.
म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
या सभेला आमदार मोनिका राजळे यांच्यासह मालेवाडी संघ, मिडसंघ, मुंगूसवाड, ढगेवाडी, काठेवाडी,बिडसंगावी,धाकनवाडी, दैत्य नांदूर, भारजवाडी,तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.