श्रीम.सारिका निमसे यांची महिला व बालकल्याण अधिकारी पदी नियुक्ती..

श्रीम.सारिका निमसे यांची महिला व बालकल्याण अधिकारी पदी नियुक्ती..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान

जामखेड प्रतिनिधी,

महिला व बालकल्याण अधिकारीधाराशिव येथे नियुक्ती झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत  श्रीम.सारिका निमसे मॅडम यांचा सत्कार लोकमान्य कला क्रीडा मंडळाचे विश्वस्त व शिक्षणप्रेमी उमेश काका देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवताना येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी.स्पर्धा परीक्षा तयारी करताना अभ्यासाचे नियोजन, पुस्तकांची निवड, वेळेचे नियोजन, विविध प्रकारच्या अभ्यासाच्या ट्रिक्स याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना मार्गदर्शकाची आवश्यकता असून अभ्यासक्रम व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे असे मत श्री सस्ते सर यांनी मांडले.

उमेश काका देशमुख यांनी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न  वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल  समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथील आदर्श शिक्षक  पिंपरे सर, ढगे सर, एन.सी. सी.ऑफिसर मयुर भोसले सर, बी एस शिंदे व  स्पर्धा परीक्षा तयारी करणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपस्थितांचे स्वागत संचालिका प्रियांका शिंदे केले. सूत्रसंचालन अजिनाथ हळनोर यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार श्री अक्षय कुदळे सर यांनी मानले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page