तेजस्विनी देवकाते यांची कृषि सहाय्यक अधिकारी पदी निवड ..
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..
जामखेड प्रतिनिधी,
स्पर्धा परीक्षा करत असताना आपण प्रत्येक आपण अपयशाने खचून जाऊ नये. अभ्यासात सातत्य आवश्यक असते.आपण घेतलेल्या निर्णयाला यशात बदलण्याची ताकद असली पाहिजे. असे तेजस्विनी देवकाते यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कृषि सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये तेजस्विनी देवकाते यांचा सत्कार उपक्रमशील शिक्षक श्री शिंदे बी एस यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी एन.सी. सी. ऑफिसर श्री मयूर भोसले सर,व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपस्थितांचे स्वागत संचालिका प्रियंका शिंदे केले. सूत्रसंचालन प्रतिक्षा खाडे यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार आजिनाथ हाळनोर यांनी मानले.