‘…….तुका झालासे कळस ‘ या सांगितिक कलाकृतीस जामखेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड:
भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदायाची परंपरा व सकल संतांच्या चरित्र कथेची एक संगीतमय कलाकृती असलेल्या ‘ज्ञानदेवे रचिला पाया! तुका झालासे कळस!!’ या पाच दिवसीय सांगितिक कार्यक्रमास बुधवार दि.१२मार्च २०२५ पासून जामखेड येथील विठ्ठल मंदिरात सुरूवात झाली असून त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन गुलाब जांभळे यांचे असून लेखन व निवेदन प्रा.श्रीकांत होशिंग व आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांचे आहे.अहिल्यानगर येथील प्रसिद्ध गायक आदेश चव्हाण व ऋतुजा पाठक यांचे गायन असून प्रणव देशपांडे (हार्मोनियम),सूरज चव्हाण (तबला) आणि प्रमोद पदमुले (मृदंग)यांची साथसंगत लाभत आहे.
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर ‘अमृत’ महोत्सवी अर्थात ३७५वा बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त जामखेड येथील विठ्ठल मंदिरात ३८व्या अखंड हरिनाम सप्ताहात दि.१२ते १६ मार्च २०२५ या पाच दिवसीय काळात या सांगितिक कलाकृतीचे आयोजन करण्यात आले आहे.