मा.श्री. विनायक विठ्ठलराव राऊत यांच्या हस्ते एकलव्य/ तक्षशिला स्कुल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न….
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरातील तक्षशिला प्रायमरी स्कूल व एकलव्य प्रि प्रायमरी स्कुल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त मा.श्री. विनायक विठ्ठलराव राऊत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले.तसेच त्यांच्या हस्ते वर्षभर अभ्यास करुन नर्सरी ते चौथी पर्यंत प्रत्येकी १ ते ४ गुणाक्रमांक आलेल्या तसेच मंथन परीक्षेस राज्य ,जिल्हा व तालुका क्रमांक आलेल्या व विद्यार्थ्यांना प्रमाणपतत्र सन्मानचिन्ह ,शैक्षणिक साहित्य व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना मा.श्री. विनायक राऊत म्हणाले, “शाळेत विद्यार्थ्यांवर घडवलेले संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता यामुळेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूर्ण वेळ देत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मेहनतीचे फलित विद्यार्थ्यांच्या शिस्त आणि उत्स्फूर्त सहभागातून दिसून येते. पुढील काळात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक अशोक जावळे म्हणाले की स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मंथन राज्यस्तरीय परीक्षेत जामखेड तालुक्यातील ६ केंद्रांवर ४५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही परीक्षा राज्यातील अडीच लाख विद्यार्थी देतात. २०१३ पासून ही स्पर्धा सातत्याने घेतली जात आहे.
या प्रसंगी इंटेरियर डिझाइनर सौ.भाग्यश्री अक्षय चांदेकर ,मुख्याध्यापक अशोक जावळे, अध्यक्ष अशोक आजबे,उपाध्यक्ष अविनाश जावळे,संचालक प्रल्हाद जावळे, मच्छिंद्र गोरे ,स्वप्नील बनसोडे , प्रशांत लिमकर , श्रीमती फुले मॅडम, श्रीमती बेंद्रे मॅडम, श्रीमती ढोले मॅडम, श्रीमती नागरगोजे मॅडम, श्रीमती काळे मॅडम, श्रीमती तवटे मॅडम,श्रीमती निगुडे मॅडम,श्रीमती पोकळे मॅडम, श्रीमती पवार मॅडम,खराडे मावशी तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक जावळे यांनी केले.