विश्वदर्शन चे संचालक गुलाबशेठ जांभळे व उद्योजक संतोष पवार हे कैलास मानसरोवर दर्शनासाठी रवाना, विविध मान्यवरांकडून सत्कार समारंभ…
कैलास पर्वत व मानसरोवर हे या क्षेत्राचे मुख्य आकर्षण
जामखेड प्रतिनिधी –
कैलास मानसरोवर, हिंदू, बौद्ध, जैन आणि बॉन धर्मांमध्ये पवित्र मानले जाणारे एक महत्वाचे ठिकाण आहे. कैलास पर्वत आणि मानसरोवर हे या क्षेत्राचे मुख्य आकर्षण आहेत. हे ठिकाण तिबेटमध्ये आहे आणि येथे आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे. याच अनुषंगाने जामखेड येथील विश्वदर्शन चे संचालक गुलाबशेठ जांभळे व उद्योजक संतोष पवार हे कैलास मानसरोवर याठिकाणी दर्शनासाठी जात आहेत. याच अनुषंगाने आज नागेश्वराच्या पावन भूमीतील नागेश्वर मंदिर याठिकाणी त्यांचा जामखेड येथील विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, भानुदास बोराटे, नगरसेवक डीगंबर चव्हाण, अमित जाधव, नामदेव राळेभात, नय्युभाई सुभेदार, पंढरीनाथ राजगुरू महाराज आनंद राजगुरू, सुरेश भोसले, आबासाहेब वीर सर, दिलीप परदेशी, संदिप ठोंबरे बाळासाहेब आरेकर व प्रदिप महारनवर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कैलास पर्वत परिक्रमा हे धार्मिक स्थळ चीन देशात आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात पवित्र ठिकाण म्हणून देखील गुगल त्याची माहिती देते आणि ही यात्रा करण्यासाठी नेपाळ आणि चीन सरकार या दोन परवानगी लागतात आणि त्यासाठी किमान पाच-सहा महिन्यांपासून चांगली प्रॅक्टिस करावी लागते दुसरा विषय असा आहे की याच्यासाठी खर्चही भरमसाठ आहे यापूर्वी यात्रेला 31 दिवस लागायचे आता ही यात्रा पंधरा दिवसात होत आहे.