महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलचा जिल्हा पातळीवरील विजय, विभागीय स्पर्धेत वाटचाल
शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर 2025
धाराशिव येथे झालेल्या स्पर्धेत विविध वजन गटांमध्ये खालील विद्यार्थिनींनी पदके पटकावली :
प्रथम क्रमांक 🥇
1. भक्ती बागल (60 किग्रॅ गट)
2. अंजली माने (75 किग्रॅ गट)
3. अक्षरा घुगे (70 किग्रॅ गट)
द्वितीय क्रमांक 🥈
4) स्नेहल पारदे (80 किग्रॅ गट)
5) नंदिनी दांगट (66 किग्रॅ गट)
या विजेत्या विद्यार्थिनींचा विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. मुंढे आर.एस. व प्राचार्य शशिकांत दौंड यांनी सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षक श्री. क्षीरसागर पी.बी., श्री. गुळवे जी.जी., श्री. खराटे डी.के., श्री. घोडके के.डी., श्री. क्षीरसागर के.टी., सौ. तांदळे जे.एस., श्रीमती कुंभार व्ही.एच., श्रीमती चौरे एस.आर., श्रीमती मोकाशी के.ए., श्रीमती अंकुशराव एस.एस. तसेच श्री. विशाल जाधव व श्री. नागेश खुणे उपस्थित होते.
विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक श्री. आदटराव एल.एल. यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार ओ.डी. सर यांनी केले तर आभार प्रदर्शन घोरपडे ए.आर. यांनी केले.