स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व शहीद सैनिकांना शिलालेखा द्वारे जामखेड करांनी दिली मानवंदना.
जामखेड प्रतिनिधी,
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुला मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ध्वजारोहण जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जामखेड नगर परिषदेचे मार्फत नागेश विद्यालयात उभारण्यात आलेला स्वातंत्र्य सैनिक व शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ उभरण्यात आलेल्या शिलालेखाचे उद्घाटन करून पूजन करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रांत अधिकारी सायली सोळंकी , जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे ,न प मुख्याधिकारी अजय साळवे , नायब तहसीलदार निखिल फराटे, नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर,रा कॉ महा प्रदेश चिटणीस राजेंद्र कोठारी , विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष मधुकर राळेभात , प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले, प्राचार्य मडके बी के ,मुख्याध्यापिका चौधरी के डी ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, नगरसेवक दिगंबर चव्हाण ,नगरसेविका ओहोळ , उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, शिवाजीराव ढाळे ,अशोक यादव,मुक्तार सय्यद,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, माजी सैनिक संघटनेचे बजरंग डोके,अध्यक्ष दिनकर भोरे, मनोज निमोणकर, शिवनेरी अकॅडमी संचालक लक्ष्मण भोरे, आकाश सानप, ज्ञानेश्वर मिसाळ,तुषार केवडे किरण भोगे, कांतीलाल कवादे, प्रमोद टेकाळे,सुनील उगले,श्रीराम मुरूमकर,दत्तात्रय सोले पाटील, कुंडल राळेभात, साळुंके बी एस, रघुनाथ मोहळकर,महेंद्र बोरा ,शेंडकर सर,चिंचकर सर आजी-माजी सैनिक, नागेश विद्यालय ,कन्या विद्यालय, विद्यार्थी ,एनसीसी कॅडेट, शिक्षक, पालक, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ नगर चे नागेश विद्यालय युनिट ने उत्कृष्ट संचलन करून मानवंदना दिली.
एम टी एस विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण व एनसीसी कॅडेट रँक व प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य अधिकारी श्री. साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना पंच प्रण शपथांचा अर्थ समजावून सांगितला. तसेच नागेश विद्यालयामध्ये सदर शिलाफलकाचे पावित्र्य जपले जाईल आणि त्यातून विद्यार्थांना देशासाठी बलिदान दिलेल्या विभुतींचे स्मरण होऊन नेहमी प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले, सूत्रसंचालन मयुर भोसले,संभाजी इंगळे, आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी केले.