*सहकार महर्षी स्व.जगन्नाथ(तात्या) राळेभात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दोन दिवस कीर्तन सोहळ्याचे आयोजन*
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील गोरगरीब
शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले
जाणारे सहकार महर्षी स्व. जगन्नाथ (तात्या
) देवराव राळेभात पाटील यांच्या प्रथम
पुण्यस्मरणा निमित्ताने दोन दिवस कीर्तन
सोहळ्याचे आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्वांनी या किर्तन सोहळ्याचा लाभ
घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक
अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार
समितीचे संचालक सुधिर राळेभात यांनी
केले आहे.
सहकार महर्षी स्व. जगन्नाथ (तात्या)
राळेभात यांचे दि २७ सप्टेंबर २०२३ रोजी
प्रथम पुण्यस्मरणा आहे. या निमित्ताने
मंगळवार दि २६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री
८ ते १० या वेळी ह.भ.प.रामायणाचार्य
रामरावजी महाराज ढोक (नागपूरकर) यांचे
कीर्तन होणार आहे. तर बुधवार दि २७
सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १२
ह.भ.प प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय
अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ)
यांचे कीर्तन होणार आहे. दि २६ व २७
सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले
दोन्ही कीर्तनाचे स्थळ बीड रोडवरील
आदित्य मंगल कार्यालय या ठिकाणी
आसुन तालुक्यातील महीला व नागरिकांनी
या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
सुधिर राळेभात यांनी केले आहे.
याच बरोबर तात्यांचे सहकारतील व शेतकरांच्या हिताचे कार्य अतुलनीय आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे
*सहकार महर्षी तात्या त्यांच्या विषयीची माहिती व तात्या कसे घडले व सहकारतील त्यांचे योगदान*
तात्यांचा जीवन परिचय
तात्यांचा जन्म 1 जून 1951रोजी राळेभात कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव गोपिकाबाई आई ताशा मनमिळावू व साध्या राहणीमान असलेल्या
तर वडिलांचे नाव देवराव.तशी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यामुळे तात्यांचे शिक्षण ९ पर्यतच झालेले. त्यानंतर त्यांनी गवंडी काम करण्यास सुरवात केली. जीवनाची जडण-घडण-
सुरवातीला गवंडी म्हणून काम केल्यानंतर तात्या जामखेड मध्ये मोठ-मोठी ठेकेदार म्हणून कामे घेऊ
लागले. सीडी वर्कचे भरपूर कामे तात्यांनी केले. याच काळात तालुक्यामध्ये तात्यांना मिस्तरी या
नावाने लोक ओळखू लागले. तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच शासकीय कामे तात्यांनी
केली. यामध्ये खास करून खैरी प्रकल्प, भूतवडा तलाव, शासकीय दुध संघ मार्केट कमिटी
ऑफिस अशी मोठ-मोठी कामे तात्यांनी ठेकेदार म्हणून अगदी योग्यरित्या पार पाडली आहेत.
कारण त्या काळी डबर बांधकाम करण्यामध्ये तात्यांचा कोणीही हात धरू शकत नव्हते. त्यानंतर
जामखेड तालुक्यामध्ये सर्वात पहिले स्लबचे काम तात्यांनी केले.
अध्यात्मिक क्षेत्रात
सन १९९३-९४ साली जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा अखंड हरीनाम सप्ताह श्री.
नागेश विद्यालय, जामखेड या ठिकाणी तात्यांच्या नियोजानाध्ये पार पडला जो आजतागायत
झालेला नाही. एवढेच नव्हे तर विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी तात्यांनी खूप मोलाची
मदत केली. तालूक्यातील अनेक ठिकाणी मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी देणे अथवा दिंडीसाठी
मदत करणे अशा विविध माध्यमातून तात्या या कार्याशी जोडून राहिले.
शैक्षणिक क्षेत्रातील तात्यांचे काम-
विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी पुढे येत नसत त्यावेळी त्यांनी
गावोगावी जावून लोकांचे मतपरिवर्तन करून दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग
विद्यालय जामखेड च्या माध्यमातून विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी जागृत केले.
राहणीमान व व्यक्तिमत्व –
तात्यांचे राहणीमान हे ३ बटणाचे शर्ट, पायजमा व टोपी असे होते. सर्वसामान्य लोकांचा
आधार हेच त्यांचे काम होते. सर्वसामान्य लोकांचा आवाज तात्या होते.
तात्यांनी बँक व्यवस्था कशी असावी म्हणून केलेले विदेश दौरे –
तात्यांनी त्यांच्या जीवनप्रवासात अनेक अभ्यास दौरे केले असून त्यामध्ये नेपाळ, भूतान,
औष्ट्रिया, ईटली सिंगापूर, लंडन, दुबई, या देशांचा समावेश असून तेथील शेती व्यवस्था, बँकिंग
व्यवस्था जाणून घेतली. तसेच त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश,
मध्य प्रदेश अशा राज्यामध्ये विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या.
तात्यांचा राजकीय सुरु झालेला प्रवास-
सन १९८५ साली जामखेड ग्रामपंचायत मध्ये स्वतःच्या भावाला म्हणजेच विठ्ठलराव
देवराव राळेभात यांना सरपंच करण्यात तात्यांचा खूप मोलाचा वाटा होता.
यावेळी तात्यांचे ठेकेदारीचे काम जोरात चालू होते. परंतु राजकारणामुळे त्यांना त्रास
व्हायला लागला. त्यामुळे त्यांनी स्वतः सक्रीय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि सन
१९९२ साली जिल्हा परिषद निवडणूक लढवली ज्यामध्ये त्यांचा अवघ्या ८१ मतांनी पराभव
झाला. या ठिकाणी त्यांनी न थांबता ते १९९५-९६ साली तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष झाले व
सहकारामध्ये त्यांनी पदार्पण केले. १९९७ साली त्यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर
संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर जामखेड नागरी सहकारी पतसंस्था स्थापन
करण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान असून त्यांनी संचालक म्हणून खूप मोठी जबाबदारी पार
पाडली आहे.
यानंतर त्यांनी खरेदी विक्री संघाचे चेअरमन, दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी सह
खजिनदार, भूविकास बँकेचे संचालक, तसेच मजूर फेडरेशनचे संचालक अशा विविध पदांच्या
माध्यमातून समाजसेवेशी आपली नाळ बांधून ठेवली. जामखेड सोसायटी, जामखेड मार्केट कमेटी
मध्ये अनेक गाळ्यांची निर्मिती करून त्यांनी सर्वसामान्य लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध
करून दिले. जिल्हा सहकारी बँकेवर त्यांनी १९९७ ते २००७ तर पुन्हा २०१५ ते २०२१ संचालक
म्हणून काम केले याशिवाय आपल्यानंतर २०२१ साली स्वतःच्या मुलाला संचालक बनवले अशी
किमया जामखेड तालुक्यात कोणालाही करता आली नाही जी तात्यांनी करून दाखवली. तसेच
आपल्या थोरल्या मुलाला कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती बनवले. याशिवाय तालुक्यातील
अनेक सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर बसवण्याचे काम तात्यांनी आपल्या राजकीय
जीवनात केले.
बँकिंग क्षेत्रात योगदान –
तात्या ज्या वेळी सन १९९७ साली पहिल्यांदा संचालक झाले त्यावेळी १९९७ साली
जामखेड तालुक्यातील एकूण कर्ज वाटप हे साधारण २ कोटीच्या आसपास होते. तात्या संचालक
झाल्यानंतर त्यांनी तळागाळातील शेतकऱ्यांना सभासद करून घेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले
तालुक्यातील जास्तीत जास्त सभासदांना कर्ज पुरवठा केला. त्यामुळेच तालुक्याचे आजचे कर्ज
वाटप १९० कोटीवर गेले आहे. तात्यांच्या काळात कर्ज वितरण झालेले कर्ज नैसर्गिक आपत्तीमुळे
शेतकऱ्यांना परतफेड करता आलेले नाही अशा ३४१२ शेतकऱ्यांना १७ कोटी ६५ लाखाची कर्जमाफी
झाली तसेच ज्या सभासदांनी विहित मुदतीत परतफेड केली अशा १०५५२ सभासदांना १५ कोटी
९८ लाख प्रोत्साहन रकमेचा लाभ मिळाला. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान
भरपाईसाठी सतत पाठपुरावा करून अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला.
तालुक्यातील होतकरू व बेरोजगार तरुणांना प्राथमिक विका सोसायटीमध्ये काम देवून
त्यांना रोजगार मिळवून दिला. थोडक्यात तात्यांनी आपला सहकार शेतकऱ्यांच्या चुलीपर्यंत
नेण्याचे काम केले आहे. समाजकारण हेच आपले राजकारण आहे हे तात्यांनी दाखवून दिले
आहे.
इतर
वैयक्तिक लाभापासून तात्या सतत दूर राहिले. कारण त्यांनी कधीही लाभाची अपेक्षा
केलेली नाही. ३७ वर्षाच्या राजकारणामध्ये तात्या विखे घराण्यांशी तसेच काँग्रेसशी एकनिष्ठ
राहिले. तालुक्यातील राजकारणामध्ये तात्या सतत अग्रस्थानी राहिले आहेत. जामखेड तालुक्याचे
राजकारण सतत तात्याभोवती फिरले आहे. जामखेडमध्ये तात्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण
केली. तालुक्यातील राजकारण तात्यांमुळे शिस्तप्रिय राहले आहे. तात्यांनी सर्व जाती धर्माच्या
लोकांना सोबत घेवून राजकारण केले. थोडक्यात एक सुसंस्कृत नेतृत्व तात्यांच्या रूपाने जामखेडने
अनुभवलं. परंतु असे हे समाजकारणी व्यक्तिमत्व ७ सप्टेंबर २०२२ रोजी आपल्याला सोडून गेले.
तात्याचे काम खूप बोलके होते. त्यामुळे तात्यांना श्राध्दाजली म्हणून अहमदनगर जिल्हा
सहकारी बँकेने जामखेड शाखेच्या सभागृहास तात्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला एवढेच नव्हे
तर लेहनेवाडी विका सोसायटी, जामखेड खरेदी विक्री संघ, जामखेड विका शॉपिंग कॉम्प्लेक्स
च्या संचालक मंडळानी ठराव ठेवून तात्यांचे नाव देण्याचा निर्णय घेवून त्यांच्या जीवनकार्याचा
गौरव केला आहे.
तेव्हा सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी तात्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे- बँक संचालक अमोल राळेभात व कृषी बाजार समिती संचालक सुधीर राळेभात