*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त गड किल्ले संवर्धना करिता  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून  ‘ स्वच्छता ही सेवा ‘ अभियाना अंतर्गत भुईकोट किल्ला शिवपट्टण (खर्डा) येथे स्वच्छता मोहीम संपन्न. . . . . . .*

 जामखेड प्रतिनिधी,

दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड जिल्हा अहमदनगर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त गड व किल्ले यांच्या संवर्धनासाठी स्वच्छता उपक्रमाचे आयोजन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड च्या वतीने भुईकोट किल्ला शिवपट्टण खर्डा ठिकाणी राबविण्यात आले.

   

 स्वच्छताअभियानाची सुरुवात सकाळी 7:00 वाजता माननीय प्राचार्य अजय वाघ साहेब, आयटीआय जामखेड माननीय प्राचार्य ओंकार खिस्ते (श्री संत गजानन महाविद्यालय ,खर्डा) माननीय प्राचार्य चंद्रकिशोर बारटक्के (श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, खर्डा )यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी देवगुडे बि. आर यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छता शपथ देऊन करण्यात आली. स्वच्छता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड,या संस्थेचे सर्व व्यवसाय प्रशिक्षणार्थीव एनएसएस स्वयंसेवक यांच्या श्रमदानातून किल्ला परिसरात समाविष्ट किल्ल्याच्या तटरक्षक भिंती वरील गाजर गवत इतरांना गवत भिंतीमध्ये उगवलेले झाडेझुडपे तोडण्यात आले तसेच घनकचरा संकलन करण्यात आले.

या स्वच्छता अभियानामध्ये स्थानिक शैक्षणिक संस्था श्री संत गजानन महाविद्यालय व श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा येथील विद्यार्थी व कर्मचारी यांनी देखील  सक्रिय सहभाग नोंदविला स्वच्छता अभियानामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी कर्मचारी यांना प्राध्यापक श्री धनंजय जवळेकर सर यांनी शिवपट्टण किल्ल्याची माहिती व ऐतिहासिक घटनांची माहिती देखील दिली. स्वच्छता अभियान स्थळास खर्डा ग्रामपंचायत चे सरपंच सौ.  संजीवनी वैजनाथ पाटील ,ग्रामपंचायत सदस्य संजय गोलेकर पत्रकार संतोष थोरात तसेच स्थानिक ग्रामस्थांनी भेटी दिल्या व अभियानामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व स्वयंसेवकाचे आभार व्यक्त केले तसेच सर्वांच्या  अल्पोहाराची सोय केली.

स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत शिवपट्टण किल्ला संवर्धनासाठी परिसर स्वच्छता अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी आयटीआय जामखेड,श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा या सर्व शैक्षणिक संस्थेतील मिळून जवळपास 100 विद्यार्थी स्वयंसेवक व कर्मचारीवृंद श्री गायकवाड केडी गटनिदेशक श्री नितनवरे पी एल गटनिदेशक श्री देवगुडे बि. आर.  एनएसएस कार्यक्रमाधिकारी शिल्पनीदेशक श्री शेख एन एम श्री शेलार सर श्री आव्हाड सर श्री दगडे सर श्री दवटे सर श्री सानप सर श्री धाऊड सर श्री देवडे सर श्री मुके सर श्री कुनाळे सर प्राध्यापक श्री धनंजय जवळेकर व दोन ही सहभागी शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभियान यशस्वी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *