जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव येथील सदर दाखल गुन्ह्यातील फिर्यादी व आडत व्यापारी दत्तात्रय बिरंगळ यांना आपल्याच आडत दुकानातील हमालीचे काम करणारा आरोपी गणेश कांबळे याने ईतर दोन जणांच्या मदतीने संगणमत करून तब्बल १० लाखांना लुटले होते. सदर गुन्हा हा दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी घडला होता. या गुन्ह्याच्या तपास करून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या गुन्हयातील गुन्हयातील ७ लाख ६० हजार रुपये जप्त करून फिर्यादीकडे सपुर्द करण्यात आले आहेत. पोलीसांच्या या चमकदार कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर असे की, खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनेगाव येथील आडत व्यापारी दत्तात्रय बिरंगळ यांचे सोनेगाव येथे आडत दुकान असुन त्यादुकानात खरेदी केलेला माल सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी येथे विक्री करून येत असताना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व बिरंगळ यांच्या आडत दुकानातील हमाल काम करणारा गणेश सुभाष कांबळे (वय १९), तुषार उर्फ सोन्या दीपक आल्हाट (वय १९), पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण (वय २०), तिघेही रा. सोनेगांव ता. जामखेड यांनी प्लॅन दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्यादी व आरोपी क्रमांक १ हे बार्शी येथील दहा लाख रुपये घेऊन येत असताना फिर्यादी यास लाकडी दांडा व लोखंडी कोयतीने मारहाण केली तसेच आरोपी क्रमांक १ यास मारहाण केल्याचा बहाना केला व फिर्यादी यांचेकडील 10 लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून निघून गेले होते.
त्यानंतर आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्याकडे सखोल चौकशी करून आरोपी यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून ७ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली तसेच गुन्हयामध्ये वापरलेली मोटरसायकल, लोखंडी कोयता, व लाकडी दांडा जप्त केला आहे.गुन्ह्यामधील जप्त रक्कम आज दि. १८ एप्रिल २०१९ रोजी फिर्यादी दत्तात्रय पंडित बिरंगळ यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सदरची चमकदार कामगिरी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशी मस्के, बाळासाहेब खाडे, विष्णु आवारे, अशोक बडे, शाम चखाले, गणेश बडे, वैजीनाथ मिसाळ यांनी केली आहे. या कामगिरीमुळे खर्डा पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या गुन्ह्यातील आरोपी अटक करून मुद्देमाल जप्त करून खर्डा पोलीसाकडे सपुर्द करण्याचे काम पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले होते. तर तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्याकडे आहे.