*जामखेड तालुक्यात अमृत कलश यात्रा उत्साहात संपन्न*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यामध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा उत्साहात संपन्न झाली. जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी या यात्रेची सुरुवात केली. तालुक्यातील राजुरी, आनंदवाडी, खर्डा, सोनेगाव, तरडगाव, नान्नज, चौंडी, हळगाव, चिखली, सातेफळ, राजेवाडी, डोणगाव, अरणगाव, पिंपरखेड, फकराबाद या गावातून सदर यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अंतर्गत प्रत्येक घरासमोरील माती जमा करून त्याचा तालुकास्तरावरील कलश तयार करण्यात येत आहे.
या कलशाची यात्रा संपूर्ण तालुक्यामध्ये काढण्यात आली. यानंतर हा कलश सन्मानाने जिल्हा परिषदला पोहोच केला जाणार असून तिथून तो कलश घेऊन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक हे सुरुवातीला मुंबईला आणि नंतर दिल्लीला जाणार आहेत मुंबई आणि दिल्ली येथे अनुक्रमे मान्य मुख्यमंत्री व पंतप्रधानांना महोदयांच्या हस्ते त्यांचे पूजन होऊन मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम देशभरात होणार आहेत.
जामखेड तालुक्यामध्ये सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रांत सायली सोळंके तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर तसेच सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.