भानुदास बोराटे महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागात केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा यंदाच्या वर्षीचा महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षण जीवन गौरव पुरस्कार देऊन भानुदास लिंबाजी बोराटे यांना सन्मानित करण्यात आले आहे. दि १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, आमदार निवास समोर नागपूर या ठिकाणी ३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात देण्यात आला. नागपूर संस्थानचे श्रीमंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ मूदोराजे भोसले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.
महात्मा फुले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ जामखेड या संस्थेच्या माध्यमातून भानुदास बोराटे यांनी जामखेड सारख्या ग्रामीण भागात सर्व सामन्यांसाठी शैक्षणिक दारे खूले केले. संस्थेमार्फत पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पद्विका विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कुल , राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डॉ. मेबल आरोळे स्कूल ऑफ नर्सिंग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शालेय व्यवस्थापन पदविका असे शैक्षणिक दालने सर्वसामान्य जनतेला खुले केलेले आहेत. संस्थे मार्फत डॉ मेबल आरोळे राज्यस्तरीय पुरस्कार, आर्दश शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार : आरोग्य व शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या महिला व पुरूषांना पुरस्कार दिला
जातो. समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करत असतांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
२०१० मध्ये भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती पुरस्कार.२०१२ मध्ये बालवृंद फौंडेशन यांचे वतीने सार्थक पुरस्कार. २०१३ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगरच्या वतीने महसूल दिना निमीत दलित मित्र पुरस्कार.
२०१४ मध्ये बाबू जगजीवन राम काण संस्कृती तथा साहित्य अकादमी दिल्ली महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय सन्मान पदक. २०१६ मध्ये जामखेड तालुका केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोशियशन च्या वतीने शिक्षण गौरव पुरस्कार.
२०१८ मध्ये जामखेड तालुका धर्मकार संघ व संत संत रोहिदास महाराज आणि रोहिदास महाराज चर्मकार संस्था जामखेड यांचे वतीने क्रांतीसुर्य संत रोहिदास महाराज क्रांतीसुर्य पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा यंदाच्या वर्षीचा महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षण जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याने भानुदास लिंबाजी बोराटे यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.