रस्ता सुरक्षा पथनाट्य श्री नागेश विद्यालयाद्वारे जामखेड मध्ये सादर.
विद्यार्थ्यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लायसन काढून गाडी चालवावी, हेल्मेट चा वापर सर्वांनी करावा व वाहतुकीचे नियम पाळावेत-मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोले
जामखेड प्रतिनिधी,
उपविभागय प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर व रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ पालकांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे जनजागृती उपक्रम व पथनाट्याचे आयोजन केले होते.
प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम संपन्न झाले.मयुर भोसले यांनी विद्यालयांमध्ये वाहतूक रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व वाहतूक नियमांचे मार्गदर्शन केले.
खर्डा चौक येथे पथनाट्य कार्यक्रमाचे उद्घाटन
मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोले यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका चोथे व हर्षल जगताप, प्राचार्य मडके बि के ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , पोलीस वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार लहू यादव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, रफिक तांबोळी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
एनसीसी ऑफिसर मयुर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट व विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षा पथनाट्याचे सादरीकरण खर्डा चौक या ठिकाणी केली.
पथनाट्याद्वारे हेल्मेटचा वापर करावा अठरा वर्षाखालील व्यक्तीने गाडी चालू नये ,वेग मर्यादा पाळा, व्यसन करून गाडी चालू नये, लहान मुलांनी गाडी चालू नये, वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असा संदेश नाटिका द्वारे देण्यात आले.
मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोले यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लायसन काढून गाडी चालवावी, हेल्मेट चा वापर सर्वांनी करावा व वाहतुकीचे नियम पाळावेत .नागेश विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी आदर्श उत्कृष्ट पथनाट्य सादर केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते असे मनोगत व्यक्त केले.
सहाय्यक फौजदार लहू यादव व पोलीस कॉन्स्टेबल गंगे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा रस्ता सुरक्षा या संदर्भात घ्यावयाची काळजी यांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे श्री नागेश विद्यालय चे एसएससी युनिटने केले.