शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड संस्थेस शासकीय निवासी शाळा, आरोळे नगर, संस्थेची क्षेत्रभेट संपन्न

मुलांना भावी करिअरच्या दृष्टिकोनातून व्यवसाय शिक्षणातुन निर्माण होणाऱ्या रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी तसेच उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी माहिती मिळावी, म्हणूनच क्षेत्र भेट- शोभा कांबळे मॅडम

 

जामखेड प्रतिनिधी,

9 जानेवारी 2023 रोजी शासकीय निवासी शाळा आरोळे नगर या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण जामखेड या संस्थेस शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांनी भेट दिली या भेटी मागचा मुख्य उद्देश म्हणजे आयटीआय मध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची ओळख व्हावी तसेच मुलांना भावी करिअरच्या दृष्टिकोनातून व्यवसाय शिक्षणातुन निर्माण होणाऱ्या रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी तसेच उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी माहिती मिळावी.

क्षेत्रभेट कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड च्या वतीने संस्थेच्या सभागृहामध्ये शाळेच्या सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्री देवगुडे बी आर( शिल्प निदेशक )यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची ओळख,अभ्यासक्रमावर शिकवल्या जाणाऱ्या सैद्धांतिक व प्रात्यक्षिक गोष्टीची माहिती दिली.

तसेच प्रत्येक व्यवसाया पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या शासकीय, निमशासकीय व औद्योगिक क्षेत्र मध्ये निर्माण होणाऱ्या नोकरीच्या व स्वयंरोजगार उच्चशिक्षण संधी याविषयी माहिती करून देण्यात आलीत्यानंतर सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांना प्रशासकीय इमारत कार्यशाळा एक व दोन यामधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या कार्यशाळेत भेटी देऊन तेथे प्रत्यक्ष कौशल्य संपादन करण्यासाठी दिल्या.

जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या वेगवेगळे कौशल्य त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची प्रत्यक्ष ओळख तसंच कार्यचलन करून प्रशिक्षणार्थ्याने तयार केलेले मॉडेल जॉब्स दाखवण्यात आले क्षेत्रभेटी अंतर्गत आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्याने नंतर वनभोजनाचा आस्वाद घेतला क्षेत्रभेटी साठी आयटीआय जामखेडच्या वतीने प्राप्त सहकार्याबद्दल शासकीय निवासी शाळा आरोळे नगर जामखेड संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे मॅडम यांनी स्वतःच्या मनोगत पर भाषणामध्ये प्राचार्य अजय वाघ साहेब श्री गायकवाड सर गटनिदेशक आभार व्यक्त केले.

क्षेत्रभेटी कार्यक्रमाच्या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी शासकीय निवासी शाळा आरोळे नगर संस्थे तील शिक्षकीय कर्मचारी श्री झिरपे सरश्री,चितळे सर , श्रीमती पारधे मॅडम,भुजबळ मॅडम आस्वार मॅडम राजळे मॅडम महानवर एम डी सर जाधव सर होलगे सर या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड या संस्थेतील श्री गायकवाड के डी (गट निदेशक)क्षेत्रभेटी कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन केले व यास श्री देवगुडे सर श्री तुमेदवार सर श्री शेख सर श्री शेळके दादासाहेब सर व श्री शेळके अक्षय सर श्री देवडे सर,श्री . शिंदे सर श्री ठाकूर सर व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *