खर्डा येथील शुक्रवार पेठ शाळेत अनोखा उपक्रम ७८ वर्षिय आज्जींचा वाढदिवस उत्साहात साजरा

खर्डा येथील जि. प. प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ शाळेला भौतिक सुविधांचा अभाव तरीही शौक्षणिक दर्जा चांगला.

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातील शुक्रवार पेठेत दोन शिक्षकीय प्रा. शाळा आहे या शाळेची मोठी दुरवस्था झाली होती परंतु ग्रामस्थ प्रशासन व शिक्षकांच्या मदतीने आता शाळेचा परिसर स्वच्छ करून एका शाळा खोलीचे बांधकाम पुर्ण झाले आसुन आता परिसरात शौक्षणिक व आनंदी वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांना बरोबरच पालकांचाही शाळेच्या विविध कार्यक्रमादरम्यान सहभाग आसला पाहिजे या हेतूने नेहमी या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात

याच पार्श्वभूमीवर शाळेच्या शिक्षकांनी या ठिकाणी महिलांच्या सहभागासाठी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते आणी या वेळी शुक्रवार पेठेतील रहिवासी श्रीमती विमलताई योगे यांचा वाढदिवस त्यांचे नातु दत्ता योगे यांनी शाळेत साजरा केला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी राजगुरू म्हणाल्या की शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे अशा मंदिरात शिक्षण घेऊन विद्यार्थी आपले भविष्य घडवत आसतात शिक्षणाशिवाय मनुष्याच्या जिवनाला अर्थ नाही प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थी घडत आसतो त्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळेत शौक्षणिक वातावरण व सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावे आनाठायी होणारा खर्च टाळुन निमित्ताने शाळेला मदत करावी असे अवहान त्यांनी उपस्थितांना केले

या वेळी परिसरातील सर्व महिला भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. प्रथम विमलताई यांना औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यात आल्या.सर्व महिलांची भाषणे झाली.पत्रकार श्री.संतोष थोरात यांनी उपस्थीत महिलांना अशा प्रकारे शाळेत वाढदिवस साजरे करून शाळेला मदत करावी असे आवाहन केले

वाढदिवसा निमित्त सर्व विध्यार्थी पालक यांना मिष्टांन्न भोजन देण्यात आले. तसेच *शाळेला 2 खुर्च्या व मोठे घड्याळ* भेट दिले. अशा प्रकारे श्री.योगे यांनी समाजाला एक आदर्श घालून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शाळेच्यावतीने सर्व योगे कुटुंबीयांचा सत्कार करण्यातआला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *