जामखेड प्रतिनिधी
भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके !
जामखेड येथील अमोल तातेड यांची भारतीय जैन संघटना अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय सत्यवान डोके म्हणाले बऱ्याच वर्षापासून मी कोठारी प्रतिष्ठानचे कार्य जवळून पाहिले आहे गुणवंतांचा सत्कार करणे ,अनेकांना मदत करणे, अपघातातील लोकांना मदत करणे तसेच आज भारतीय जैन संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी अमोल तातेड यांची निवड झाली आणि जिल्हा सचिव पदी प्रफुल्ल सोळंकी यांची निवड झाली आशी माहिती कळाली खूप आनंद वाटला. जामखेड सारख्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिल्ह्याची जबाबदारी पडली आज त्यांचा सत्कार करण्याचा मला योग आला.
तसेच यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले भारतीय जैन संघटनेचे कार्य बिजनेस डेव्हलपमेंट,पाणी आडवा पाणी जिरवा ,मूल्यवर्धन शिक्षण, तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वी जामखेड तालुक्यातील भुतडा तलावातील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्याचे काम केले आहे तसेच मुलींसाठी त्यांच्या सक्षमी करणासाठी प्रत्येक शाळेत स्मार्ट गर्ल्स हा उपक्रम राबवला कोरोणा काळामध्ये मोफत टिफिन तसेच लोक वर्गणीतून गरजूंना किरणा पोहोच केला असे अनेक काम भारतीय जैन संघटने मार्फत होत आहे अमोल तातेड यांचे कार्य पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी ही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या हातून समाजसेवा घडो असे कोठारी म्हणाले
यावेळी बोलताना अमोल तातेड म्हणाले मी बऱ्याच वर्षापासून तालुकाध्यक्ष पद भुषवले आहे बरेच काम भारतीय संघटनामार्फत केले आहे.
साधू संतांची विहार मध्ये सेवा विहार ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नेहमी करतो मी आता जोमाने कामाला लागेल माझ्यावर मोठी जबाबदार दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे प्रयत्न करणार आहे मला माझ्या मित्र परिवाराचे सतत खूप सहकार्य असते आणि त्या सर्वांमुळेच मला आज या पदाच्या लायक समजुन ही जबाबदारी वरिष्ठांनी दिली आहे.
यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके , सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, योगेश कवादे आदि उपस्थित होते.