जामखेड प्रतिनिधी –

जामखेड येथे नगर रोड व बीड रोड येथील
कलाकेंद्रामध्ये सर्रासपणे राजरोस बाल कामगार व अल्पवयीन मुलींचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जामखेड शहरामधील कलाकेंद्र मध्ये आजपर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलांचा वापर बालकामगार म्हणुन केलेला आहे परंतु अल्पवयीन मुलांना सदर ठिकाणी पैशांचे अमीष दाखवुन व त्यांचे आईवडील तथा पालकांना पैशांच्या स्वरूपात उचल देवून (आगाऊ रक्कम) दबावात घेवून सांभाळलेल्या गुंडामार्फत जिवे मारण्याच्या धमक्या देवुन राजरोसपणे कलाकेंद्रामध्ये निकृष्ट दर्जाची कामे करण्यास भाग पाडले जात आहे. तसेच अल्पवयीन मुलांना व्यसनांच्या आहारी लावुन त्यांचे जिवन उध्दवस्त केले जात आहे.
काही गावातुन कलाकेंद्रामध्ये अल्पवयीन मुलींचे आईवडील तथा पालक यांना पैशाच्या स्वरूपात लाखो रूपयांची उचलीचे अमिष दाखवून व कशा स्वरूपाचे नोटराईजड दस्त करून राजरोसपणे अल्पवयीन मुलींना कलेच्या नावाखाली कलाकेंद्रामध्ये जबरदस्तीने ठेवले जात आहे. तसेच अल्पवयीन मुलींवर मानसिक व शाररिक अत्याचार करून त्यांचेकडून बळजबरीने व त्यांचे इच्छे विरूध्द वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे.
ही अत्यंत गंभीर बाब असून त्याबाबत कलाकेंद्राचे परवानाधारक महिलांवर आजपर्यंत वेळोवेळी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. असे असताना देखील नियमांमध्ये तशा स्वरूपाची तरतुद असताना देखील कलाकेंद्राचे परवाने रद्द झालेले नाहीत. व पुन्हा त्यांचे परवाने नुतनीकरण करण्यात आलेले आहेत.त्यामुळे जामखेड शहर व आसपासचे गावातील बऱ्याचश्या गावातील अल्पवयीन मुलींना कलाकेंद्रामध्ये पैशाचे अमिष दाखवून आणण्यासाठी कलाकेंद्र येथे काही टोळ्या कार्यरत आहे. तसेच कलेच्या नावाखाली सदर कलाकेंद्राचे बेकायदेशीर व गुन्हेगारी कृत्य राजरोसपणे चालु आहे.
सदर कलाकेंद्रामध्ये आल्यानंतर लोकांना प्रथमता दारू, गांजा, गुटखा, व इतर अंमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडून तेथील महिला अंगप्रदर्शन व अश्लील चाळे करून शाररीक संबंध ठेवण्यासाठी उत्तेजीत करतात. आणि लोकांबरोबर प्रेमाचे तथा मालकीण असल्याचे दर्शवुन लोकांना वेगवेगळया प्रकारे तथा मानसि रित्या ब्लॅकमेल केले जातात.
तसेच अवैध व बेकायदेशीर व्यवसाय परवाने तातडीने कलाकेंद्रा परवाने रद्द करण्यात यावेत व त्यांचे विरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांन कडुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *