जामखेड प्रतिनिधी
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची राज्यस्तरीय कमीटी पदी नियुक्ती
नियुक्ती झाल्याने कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान
मेहनत जिद्द व आईवडीलाचे संस्कार हेच महत्वाचे असतात- प्रकाश पोळ
जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापन राज्यस्तरीय समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानीत करण्यात आले
जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटाविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची राज्यस्तरीय ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापन कमीटी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन त्यांना सन्मानीत करण्यात आले तर संजय काका कोठारी यांचे काम खूप मोलाचे असुन समाजापती त्यांचे असणारे प्रेम आदर आणी योगदान हे खुप मोठे आहे
आणी अशा व्यक्तीच्या वतीने माझा सन्मान होतो आहे या पेक्षा मोठ भाग्य काय असु शकते असे यावेळी सत्कार मुर्ती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी स्पष्ट करत संजय कोठारी यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच गट विकास अधिकारी प्रकाश पोळ हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत अशाच व्यक्तीची जामखेडला गरज आहे
कारण पोळ साहेब सुट्टीच्या दिवशी सुध्दा आपल्या कार्यालयात येऊन काम करत असतात त्यांची झालेली निवड ही योग्य असून ते पुढेही असेच चांगले काम करून जामखेडकरांची मान उंचावतील असा आम्हाला विश्वास असल्याचे कोठारी यांनी यावेळी स्पष्ट करत प्रकाश पोळ यांचे कौतुक केले तर विस्तार अधिकारी माने यांनी ही कोठारी व प्रकाश पोळ यांच्या कार्याचे गुणगान करत त्यांना शुभेच्छा दिल्या
या वेळी सचिन गाडे, विस्तार अधिकारी माने, भजनावळे, ग्रामविकास अधिकारी युवराज ढेरे, स्वप्निल नेहरकर, ग्राम रोजगार सेवक नाना सावंत, जगधणे मामा इत्यादि उपस्थित होते