जामखेड प्रतिनिधी

 

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म स्थान असलेल्या चौंडी येथे विविध नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक करण्यात येणार असून महापूजा व कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ३० तारखेला रात्री ९ वाजल्यासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन आणि 31 तारखेला दिवसभर महाप्रसादाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आले असून देशभरातून चौंडी येथे येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व ३१ तारखेला दिवसभर महाप्रसाद वितरणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा व जयंती निमित्त उपस्थित रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *