*कर्जत बस डेपो आणि कुसडगाव ‘एसआरपीएफ’ केंद्राच्या भव्य विकासकामांचा दिमाखदार लोकार्पण सोहळा*
*आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन*
कर्जत-जामखेड, ता. २४:
कर्जत-जामखेडचे यशस्वी आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जत बस डेपोच्या ५ कोटी ४ लाख रुपयांच्या अत्याधुनिक विकासकामांचा आणि कुसडगाव येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘एसआरपीएफ’ प्रशिक्षण केंद्राच्या ९० कोटी रुपये खर्चाच्या भव्य वास्तूचा दिमाखदार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अॅड. अनिल परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा भव्य लोकार्पण सोहळा गुरुवारी (२६ सप्टेंबर) रोजी संपन्न होणार असून कर्जत बस डेपोचा लोकार्पण सोहळा कर्जत बाजारतळ येथे सकाळी १० वाजता तर एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा कुसडगाव येथे सायंकाळी ३ वाजता होणार आहे.
कर्जत बस डेपोच्या आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांसाठी आरामदायी आणि जलद सेवा उपलब्ध होणार आहे, तर कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचा कर्जत-जामखेडसह शेजारच्या जिल्ह्यांसाठीही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. या विकासकामांमुळे कर्जत-जामखेडच्या विकासाला गती मिळणार असून, स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू असून कर्जत जामखेडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .