मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री रविकिरण साहू यांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंग माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न!
जामखेड प्रतिनिधी
मध्यप्रदेशचे रविकरण साहू कॅबिनेट मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंग माने सचिव, प्रदेश भाजपा किसान मोर्चा यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की देशाला स्थिर सरकार देण्याचे काम मध्यप्रदेश सरकारने केले आहे. पांडुरंग माने यांनी पुण्यात राहूनही आपल्या भागातील नाळ सोडली नाही. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे एक चांगले काम करत आहेत. समाजाचे भान, थोरामोठ्यांचा मान व मित्रांचा सन्मान राखण्याची काम पांडुरंग माने यांनी केले आहे.
यानंतर मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री रविकिरण साहू यांनी शुभेच्छा देताना सांगितले की पुढील काळात शेतकऱ्यांसाठी काम करा, देशाची सेवा करा व राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. समाज सेवेचे काम करत रहा कारण काम करणारा कार्यकर्ताच हा मोठा होत असतो.
समाजासाठी काम करत असताना मी 56 जिल्ह्यात प्रचार आणि प्रसार केला आहे. जामखेड तालुक्यातील अहिल्याबाई होळकरांच्या जन्मभूमी मध्ये मी आलो हे माझे भाग्य असून याचे मला समाधान आहे असे देखील मत रविकरण साहू यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपा जेष्ठ नेते मा.श्री. मधुकर (आबा) राळेभात तसेच उत्तम माने, व नेते मंडळी, वकील मित्र, तसेच परिसरातील जेष्ठ मंडळी युवा मित्र महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.