शंभुराजेंचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणारा छावा चित्रपट महीलांसाठी मोफत

समाजसेवक निलेशभाऊ गायवळ व उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच अनोखा उपक्रम

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे समाज सेवक निलेशभाऊ गायवळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व उपनगराध्यक्ष महेश भारत निमोणकर यांच्या वतीने जागतिक महीला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी दि ८ ते १० मार्च या तारखेपर्यंत जामखेड येथील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहात छत्रपती संभाजीराजे यांच्या जिवनावरील छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.

सध्या विकी कौशलच्या छावा सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या १४ फेब्रुवारी २०२५ पासुन सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. सिनेमा पाहिल्या नंतर प्रत्येकजणं भावुक होतोय. सिनेमातल्या कलाकारांचही प्रचंड कौतुक होतंय. इतकंच नाही तर अनेक राजकीय मंडळींकडून महीलांसाठी छावा सिनेमाचे फ्री शो देखील आयोजित केले जात आहेत. याच अनुषंगाने जामखेड मध्ये देखील जामखेड महीला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी समाजसेवक निलेशभाऊ गायवळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष महेश भारत निमोणकर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावरील छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत.

जामखेड येथील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहात महीला दिनानिमित्त दि ८ मार्च, ९ मार्च व १० मार्च रोजी सकाळी १२ ते ३ व ३ ते ६ असे दररोज दोन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त महीलांनी या मोफत छावा चित्रपट पहाण्याचा लाभ घ्यावा तसेच ज्या महीलांना मोफत चित्रपट पहाण्याचा आहे त्यांना मोफत पाससाठी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच्या मो. 9511301111 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष महेश भारत निमोणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *