पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार.. कुंडलिक सोनटक्के यांचा जीवन प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी.. नंदनवन पार्कचा आ.धस यांच्या हस्ते शुभारंभ.. 

पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार..

कुंडलिक सोनटक्के यांचा जीवन प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी..

नंदनवन पार्कचा आ.धस यांच्या हस्ते शुभारंभ..

 

आष्टी ( प्रतिनिधी )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पंतप्रधान आवास योजना द्वारे गोरगरीब जनतेचे स्वतःच्या हक्काचे घर असावे हे स्वप्न पूर्ण होत असून कुंडलिक सोनटक्के यांनी ग्रामीण भागामध्ये दर्जेदार घरे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून मातृभूमी मध्ये अद्ययावत सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त अशी नंदनवन पार्क ही वसाहत लवकरच पूर्ण होईल असा विश्वास आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले .

आष्टी तालुक्यातील जामगाव येथील मूळ रहिवासी असलेले पुणे येथील यशस्वी बांधकाम व्यावसायिक कुंडलिक सोनटक्के यांनी आपल्या मातृभूमी मध्ये नंदनवन पार्क येथे अत्यंत चांगल्या पद्धतीने दर्जेदार सिमेंट रस्ते चिल्ड्रन्स पार्क खेळाचे साहित्य आणि कम्युनिटी हॉल असलेल्या वसाहतीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि गोरगरीब जनतेमध्ये घराचे बांधकामासाठी अनेक अडचणी येत असतात त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी पंतप्रधान आवास योजना निर्माण केली आणि गोरगरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना या योजनेद्वारे घरे उपलब्ध झाली असून आष्टी तालुक्यामध्ये एकूण 18000 घरकुले मंजूर झाले असून आष्टीलगतमोर्शिदपूर ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर झाले आहेत.

गुंठेवारी मुळे निर्माण झालेली समस्या यावर उपाययोजना करण्याचा आपण प्रयत्न करत असून याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची सांगत ते म्हणाले की कुंडलिक सोनटक्के हा जामगाव सारखे ग्रामीण भागातून सुरुवातीला ऊस तोडणी जे काम केल्यानंतर रोजगारासाठी पुणे शहरात जाऊन लाईट फिटिंग च्या कामाबरोबरच बांधकामाचे प्रशिक्षण घेऊन छोटे छोटे बांधकाम घेऊन आज यशस्वी बांधकाम उद्योजक म्हणून त्यांनी नाव कमावले आहे त्याने घेतलेले परिश्रम मेहनत आणि कष्ट यातून त्याने मोठे यश मिळवले आहे ग्रामीण भागातील तरुणांनी या कुंडलिक सोनटक्के यांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास करावा आणि त्यांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये यशस्वी कसे व्हावे हा मंत्र त्यांच्याकडून शिकावा असे त्यांचे आदर्शवत जीवन आहे.

त्यांनी आपल्या मातृभूमी मध्ये येऊन कर्तव्य समजून आष्टी येथील नंदनवन पार्क द्वारे सुसज्य अध्यायावत वसाहत निर्मितीचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले नंदनवन पार्कच्या या शुभारंभ प्रसंगी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजिनिअर किशोर हंबर्डे आष्टी तालुका दूध संघाचे माजी चेअरमन आदिनाथ सानप सेवानिवृत्त तहसीलदार शहादेव गीते ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस जामगावचे सरपंच राधेश्याम धस, गौतम नाना आजबे, सतीश शेठ धस, जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे, डॉक्टर नदीम शेख सतीश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page