फिनोलेक्स पाईप्स व शितल ट्रेडर्सच्या वतीने वारकर्यांना मोफत बॅगा व काठ्या वाटप
जामखेड प्रतिनिधी
संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व शितल ट्रेडर्सचे यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वयोवृद्ध वारकर्यांसाठी मोफत काठ्या व सामान ठेवण्यासाठी बॅगा वाटप करण्यात आल्या.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.२५) श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघण्यासाठी मार्गस्थ झाला होता. या दिंडी सोहळ्याचे जामखेड शहरात आगमन होताच शहरातील तपनेश्वर भागात ठिकठिकाणी वारकऱ्यांना नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट, औषध, पाणी व्यवस्था केली होती.
याच अनुषंगाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व शितल ट्रेडर्सचे यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी काठ्या व पिशव्या वाटप करण्यात आल्या. यावेळी शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी बोलताना सांगितले की दहा ते पंधरा दिवस वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत असतात. यामधिल वयोवृद्ध वारकर्यांसाठी काठी व बॅगा वाटप करण्यात आल्या ही वारकर्यांची सेवा करण्याचा योग आला हे आमचे भाग्य आहे.
यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडकडचे दादासाहेब गडाख, तसेच शितल ट्रेडर्सचे संचालक उमाकांत अंदुरे, शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे, दादा अंदुरे, गणेश मसाळ , महेश मासाळ, गणेश सुरवसे, संजय राऊत, कपिल माने आणि शितल कलेक्शनचा सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.