Home जामखेड वार्ता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास

0
9

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास..

मुकपदयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे: पांडुराजे भोसले.

जामखेड प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास हा उपक्रम जामखेड तालुक्यातील हजारो शिवशंभुभक्त अत्यंत निष्ठेने पाळतात आणि यामध्ये सहभागी होतात.

श्री.शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय श्री.संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जामखेडसह देशातही पाळला जातो.यातुन छत्रपती शिवाजी व संभाजी राजेंच्या विचारांवर चालणारी एक आदर्श विचारांची फळी तयार व्हावी हाच एक महान उद्देश आहे.

धर्मवीर बलीदान मास पाळताना या महिनाभरात कोणी पायात पादत्राणे घालत नाही,कोणी गोड अन्न खाणे टाळतात,कोणी एकच वेळ जेवण करतात,कोणी गादीवर झोपत नाही,कोणी आपल्या डोक्यावरील केस काढुन मुंडण करतात अशा अनेक प्रकारच्या त्यागातुन हा महिना अत्यंत कडवटपणे पाळुन आपल्या आदर्श राजांना आदरांजली वाहतात.

यामध्ये लहान मुले,मुली,युवक,युवती,महीला आणि पुरुष वरील सर्व गोष्टींचा त्याग करतात व दररोज आपल्या शंभुराजेंना आदरांजली देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील शनि मारुती मंदिर आणि हनुमान मंदीर तपनेश्वर रोड कुंभार गल्ली या दोन्हीही ठिकाणी येथे एकत्र येऊन श्री.संभाजी सुर्यऋदय श्लोक घेऊन अर्थासहीत स्पष्टीकरण देऊन आदरांजली वाहण्यात येते.

दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने वढु बुद्रुक अर्थात संभाजी महाराज समाधी स्थळ येथून धर्मवीरज्वाला पायी आणली जाते त्याच अनुषंगाने यावर्षी सोमवार दि.१६/३/२०२६ रोजी अनेक धारकरी वढु बुद्रुक याठिकाणी गेले आणि आज मंगळवार दि.१७ मार्च २०२६ रोजी पायी ज्योत जामखेड या ठिकाणी घेऊन आलेले आहेत.सर्वांना दर्शनासाठी आणलेली धर्मवीर ज्वाला शनि मारुती मंदिरामध्ये ठेवलेली आहे.

बुधवार दि.१८मार्च २०२६ रोजी शनि मारुती मंदीर,छत्रपती शिवाजी महाराज पेठ जामखेड येथुन जामखेड शहरामध्ये सायंकाळी ५:३० वाजता मुकपदयात्रा काढली जाणार आहे.

तरी शंभुराजेची न निघालेली अंत्ययात्रा ही धर्मवीर ज्वालेच्या रुपाने काढण्यात येते. तरी दि १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठिक ५-३० सर्व शिवशंभुप्रेमींनी मुकपदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी केले आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page