जामखेड कर्जत रोडवर विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन पल्टी,आठ जण जखमी.
जामखेड कर्जत रोडवर विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन पल्टी,आठ जण जखमी.
दोघांची प्रकृती चिंताजनक..
जामखेड प्रतिनिधी
अकलुज येथे वॉटरपार्कला जात असलेल्या विद्यार्थींच्या चारचाकी वहानाने शहरापासून तीन कीमी अंतरावरील जामखेड कर्जत रोडवरील रत्नदीप मेडीकल कॉलेज जवळ या वहानाने अचानक दोन ते पल्टी मारल्या.
या चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात चालकासह एकुण सात जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे.
श्रेयश प्रल्हाद राजगुरू, एक चार चाकी वाहन चालक, चौत्यन्य भक्तराज राजगुरू, ओम महेंद्र राऊत, सौरभ बबन यवले, साहिल अंबिका जाधव, यश संतोष खेत्रे, अमिन शेख (सर्व रा. जामखेड) अशा आठ जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील नववी व दहावीचे विद्यार्थी हे अकलुज येथिल वॉटरपार्क या ठीकाणी फीरण्यासाठी चारचाकी वहान क्रमांक एम एच- १६ बी.व्ही ०१०४ याने रविवार दि २९ रोजी सकाळी सात वाजता चालले होते. यावेळी त्यांचे चारचाकी वहान हे जामखेड शहरापासून तीन कीमी अंतरावरील जामखेड कर्जत रोडवरील रत्नदीप मेडीकल कॉलेज जवळ आले होते. यावेळी वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व अचानक या वहानाने दोन ते तीन पलटी मारल्या यावेळी गाडीने रोडच्या बाजुला आसलेल्या लाईटच्या पोलला धडक दिली. यानंतर बाजुच्या तारेचे कंपाउंड तोडुन गाडी आतमध्ये शिरली या वेळी अपघाताचा मोठा अवाज झाल्याने बाजुच्या वस्तीवरील लोक धावत आले व इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीच्या बाहेर काढले.
या आपघातात चालकासह एकुण आठ जण जखमी झाले आसुन यातील श्रेयस प्रल्हाद राजगुरू व गाडीचा चालक हा गंभीर जखमी झाला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर या ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![]()
