मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्याकडे पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्याकडे पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
प्रमुख बाजार समित्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त जबाबदारी सोपविल्याची माहिती..
जामखेड प्रतिनिधी
राज्यातील बाजार समित्यांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांना पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

या पदावर यापूर्वी संजय कदम कार्यरत होते. त्यांच्या जागी आता शरद जरे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाने यासंदर्भातील पूर्वीची स्थानिक व्यवस्था रद्द करत नवीन आदेश जारी केला आहे.
हा आदेश ७ एप्रिल २०२६ पासून लागू असून पुढील आदेश येईपर्यंत शरद जरे हेच या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. सदर आदेश उप सचिव नितिन गायकवाड यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार जारी केला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सहा महसूल विभागांतून मुंबई APMC मध्ये येणाऱ्या शेतकरी प्रतिनिधीं व मार्किट संचालक यांच्या काही प्रमाणात धाकधूक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
जरे यांच्या शिस्तबद्ध व कडक कारभाराची दखल घेत पणन विभागाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मुंबई APMC मध्ये सचिव म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक गैरव्यवहारांवर कारवाई केली आहे .
त्यामुळेच आता मुंबईसह पुणे, नाशिक आणि नागपूर येथील प्रमुख बाजार समित्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविल्याची माहिती समोर येत आहे.
या बदलामुळे पणन विभाग तसेच बाजार समित्यांच्या कारभारात अधिक वेग आणि समन्वय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
![]()



