याही वर्षी कालिका पोदार लर्न स्कूलचा 100% निकाल — प्रवेश प्रक्रिया सुरू
याही वर्षी कलिका पोदार लर्न स्कूलचा डंका,तीन तालुक्यांत कु जान्हवी सुहास सूर्यवंशी प्रथम
जामखेड (प्रतिनिधी):
जामखेड येथील कालिका पोदार लर्न स्कूलने इयत्ता दहावी CBSE (शैक्षणिक वर्ष 2025-26) परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन करत 100% निकालाची अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीमुळे व विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हा उल्लेखनीय निकाल साध्य झाला आहे.
या परीक्षेत जान्हवी सुहास सूर्यवंशी हिने 98.20% गुणांसह जामखेड, पाटोदा व आष्टी या तीन तालुक्यांत प्रथम क्रमांक पटकावला, ज्यामुळे शाळेचा गौरव अधिक वाढला आहे.
तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
प्राजक्ता प्रविण धागे व समर्थ दीपक धोंडे (97.60%),
प्रज्वल दत्तात्रय पंधारे व पृथ्वीराज द्रुपदराज दोके (96.80%),
पिंगळे यश अशोक (94.20%),
सोहम भिमराव दुचे (93.20%),
अभिनव सचिन काकडे (92.60%),
पियुष कैलास माने (90.40%),
शर्विल विजय झंजाड (90.40%) व
अथर्व बाळासाहेब येडके (90.00%) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
एकूण 47 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले, तर 14 विद्यार्थ्यांनी 80 ते 89% दरम्यान गुण मिळवले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा अधिक गुण मिळवले असून शाळेचा एकूण सरासरी निकाल 82% इतका राहिला आहे.
विशेष म्हणजे, मराठी विषयात 10 विद्यार्थ्यांनी व आयटी विषयात 5 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले, जे शाळेच्या उच्च दर्जाच्या शिक्षणाचे द्योतक आहे.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यातही अशीच प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 
![]()
