Home जामखेड वार्ता सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करुन कारवाई करा

सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करुन कारवाई करा

0
3

सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करुन कारवाई करा

अन्यथा आठ दिवसात कलाकेंद्र मालक उपोषणास बसणार

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील कलाकेंद्र मालक व कलाकारांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत गेल्या आठ दिवसांपासून सचिन दत्तात्रय आजबे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच सचिन आजबे यांच्या उपोषणाची वस्तुस्थिती तपासण्यात यावी, त्यांनी प्रत्यक्षात अन्नत्याग केला आहे की नाही याची चौकशी करावी तसेच उपोषण सुरू झाल्यापासूनचा आरोग्य अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही जामखेड परीसरातील ९ कलाकेंद्र मालकांनी तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच सचिन आजबे याच्या उपोषणाची चौकशी करुन कारवाई न झाल्यास येत्या आठ दिवसांत उपोषणास बसण्याचा इशारा कलाकेंद्र मालकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड व परिसरातील सर्व कलाकेंद्रे शासनाच्या नियम व अटींचे पालन करून कायदेशीर परवानग्यांच्या आधारे चालविली जात आहेत. या कलाकेंद्रांवर सुमारे १२०० ते १३०० कलाकारांचा उदरनिर्वाह अवलंबून असून त्यांच्या कुटुंबातील एकूण ५ ते ६ हजार नागरिकांचे जीवनमान या व्यवसायाशी जोडलेले आहे. यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे. जामखेड येथील सर्व कलाकेंद्र मालक कलाकार हे भटके विमुक्त कोल्हाटी समाजातील असुन त्यांचा पिढ्यान पिढ्याचा हा व्यवसाय आहे. तसेच पोटाची खळगी भरण्याचे मुख्य साधन आहे.

याबाबत कलाकेंद्र मालकांनी आरोप केला आहे की, उपोषणास बसलेली सचिन आजबे या व्यक्तीचे जामखेड शहरात वेगवेगळे अवैद्य व्यावसाय असुन त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सचिन आजबे हा गेल्या चार वर्षांपासून कलाकेंद्र चालकांकडे पैशांची मागणी करत असून मागणी पूर्ण न झाल्यास तक्रारी, निवेदने व उपोषणाच्या माध्यमातून कलाकेंद्र मालक व कलाकारांची बदनामी करण्याचे काम करत आहेत. तसेच सोशल मीडियाचा वापर करून समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, जामखेडमधील सर्व कलाकेंद्रे शासनाच्या नियमांचे पालन करीत असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाहीत. त्यामुळे सुरू असलेले उपोषण हे शासनाची दिशाभूल करणारे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय सचिन आजबे यांच्या उपोषणाची वस्तुस्थिती तपासण्यात यावी, त्यांनी प्रत्यक्षात अन्नत्याग केला आहे की नाही याची चौकशी करावी तसेच उपोषण सुरू झाल्यापासूनचा आरोग्य अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जामखेडमधील सर्व कलाकेंद्र मालक व कलाकार येत्या आठ दिवसांत उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सचिन आजबे याच्या उपोषणामुळे विणाकारण जामखेड शहरामधील वातावरण बिघडत असुन समाज्यात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी कलाकेंद्र मालकीण अलका हौसवराव जाधव, मंदा हिरामण चंदन, भामाबाई किसन जाधव, लता शालन जाधव, संजीवनी रामभाऊ जाधव, मंगल पोपट जाधव, राजश्री धोंडाबाई जाधव, ज्योती मोतनाबाई पवार व अंबिका नाजुकबाई अंधारे यांनी पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page