जामखेड प्रतिनिधी
जवळा येथे श्री संत सावता महाराज मंदिरासाठी सभामंडप , भक्तनिवास, स्वयंपाक गृह, पेविंग ब्लॉक व विविध विकास कामांसाठी तात्काळ निधी मिळावा यासाठी जवळा ग्रामपंचायत व सावता ग्रूप च्या वतीने माजी मंत्री व कर्जत जामखेड चे आमदार मा प्रा राम शिंदे साहेब यांच्याकडे मुंबई येथे भेटून मागणी केली. यावेळी जवळा सरपंच प्रशांत भाऊ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते एकनाथ (नाना) हजारे, युवा नेते राहुल बप्पा पाटील, सावता ग्रूप चे कार्याध्यक्ष व युवा नेते सावता हजारे, अमोल हजारे, ग्रामपंचायत सदस्य अनिल हजारे उपस्थित होते.
या वेळी आमदार राम शिंदे साहेब यांच्या बरोबर जवळा येथील श्री संत सावता महाराज मंदिर सभामंडप व विविध विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा झाली. तसेच या कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार शिंदे साहेब यांनी दिले.
१० जुलै पासून जवळा येथे मराठी शाळेजवळ नवीन जागे मध्ये श्री संत सावता महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात चालू आहे. जवळा ग्रामपंचायत ने मराठी शाळेजवळ श्री संत सावता महाराज सभामंडप व विविध विकास कामांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. जागा उपलब्ध करण्यासाठी सरपंच प्रशांत भाऊ शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ नाना हजारे यांनी पुढाकार घेतला. तसेच ग्रामपंचायत चा ठराव घेण्यासाठी सर्व सदस्य ,ग्रामविकास अधिकारी बहिर भाऊसाहेब तसेच सावता ग्रूप व गावातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
मराठी शाळेजवळ उपलब्ध करून दिलेल्या नवीन जागेत या वर्षीचा संत सावता महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. त्यामुळे या नवीन जागेत सभामंडप व विविध विकास कामे व्हावी अशी सर्व ग्रामस्थ व भक्तांची मागणी होत आहे.