नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या १५ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते केला विद्यार्थ्यांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पिढी घडवण्याचे काम होत आसते. प्राथमिक शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवोदय व स्कॉलरशिप चा पाया पक्का केला पाहिजे. त्यामुळे जामखेडची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालकांसह शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत आसे मत जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या वर्षी शासनाच्या वतीने 12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेडच्या पाचवी व आठवीच्या १५ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. याच अनुशंगाने नुकतेच या गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने व गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या सह विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या वेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, संस्थेचे उमेश (काका) देशमुख, राजेंद्र देशपांडे, युवराज भोसले (सर) शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना राळेभात मॅडम, अविनाश बोधले, धनराज पवार सह सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.
पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी पोळ म्हणाले की चांगले शिक्षण घेतले तर यश नक्कीच मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनसाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी खुप कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच पाया पक्का केला पाहिजे.
जामखेड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहेत. प्रथम जिल्हा परिषद शाळांचा देखील विकास झाला पाहिजे त्याशिवाय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणार नाही. स्पर्धा परीक्षेवर विद्यार्थ्यांनी फोकस केला तर भविष्यात उच्च शिक्षणासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल असे सांगितले.
यामध्ये इयत्ता पाचवी मधिल अथर्व शिरसाठ, आयुष बोधले, श्रेयसी भोसले, मधुर कांबळे, श्रेया गवसणे, अवंती चव्हाण, सार्थक गीते, अलीझा शेख, प्रणव इथापे तर आठवी मधिल रुद्र पोकळे, रीतेश खुपसे, सार्थक तुपविहीरे, ओंमकाराजे जायभाय, श्रावणी बारगजे, आनुष्का गोरड आसे पंधरा विद्यार्थी शासनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या श्रीमती महाजन मॅडम, बांगर सर, भांगरे सर, हजारे सर, पवार मॅडम, बेलेकर मॅडम व मुख्याध्यापिका श्रीमती राळेभात मॅडम यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम. येवले, श्रीम. वाघ मॅडम तर आभार मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम यांनी मानले.