Pune Shivajinagar Court Firing : फायरिंग, आरडाओरड अन् पळापळ! गोळीबार झालेला व्यक्ती कोण? कोर्टाबाहेर भरदिवसा दोन्ही हात छाटले
Pune Shivajinagar Court Firing Case : सध्या हल्ला झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला ससून रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. तसेच आता फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे.
पुणे प्रतिनिधी
Pune Shivajinagar Court Firing : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार अन् एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. एका मास्क घातलेल्या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा तरुणांनी गोळीबार केला. पण गोळीबार चुकल्याने तरुणांनी कोयत्याने हल्ला केला अन् दोन्ही हात छाटले होते. गोळीबार झालेला व्यक्ती एका केसममध्ये आरोपीच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप अधिकृतरित्या यावर कोणतीही माहिती दिली गेली नाही. सध्या हल्ला झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला ससून रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. तसेच आता फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे.
गोळीबार झालेला व्यक्ती कोण?
20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या/आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून करण्यात आला होता. मंदार मारुती किवळे हा त्यातील आरोपी आहे. चार दिवसापूर्वी तो कारागरातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात काय घडलं?
क्राइम ब्राँच टीम घटनास्थळी पोहोचली असून या घटनेत पाच ते सहा जण मारेकरी होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. दोन गाड्यावरून आरोपी आले. त्यांनी गोळीबार केला अन् कोयत्याने सपासप वार केले. आरोपीवर 15 ते 20 वार केल्यानंतर त्याच सर्व आरोपींनी गाडीवरून पळ काढला. पोलिसांनी तातडीने जखमी व्यक्तीला रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलला नेलं.
पूर्ण लोड मॅगझिन घटनास्थळावर पडलेली दिसली. आम्ही वर कोर्टात होतो दुसऱ्या मजल्यावर, आम्ही खिडकीजवळ आलो, तिथे दिसलं की एका इसमाच्या मागे पळत आहेत आणि गोळीबार सुरू आहे. कोयते वगैरे घेऊन पळत आहेत आणि तोफखाना चौकटीत पळत गेले आहेत. पुणे शहराची गुन्हेगारी टॉप लेव्हलला गेलं आहे. कोर्ट संरक्षणासाठी पोलीस होते तिथे ते तातडीनं दाखल झाले आहेत. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. ती व्यक्ती कोण होती ते समजू शकलं नाही. परिसरात भीतीचं वातावरण आहे.
![]()
